ताज्याघडामोडी

रेवदंडा अर्बन बँकेची पोयनाड शाखा नव्या जागेत स्थलांतरित

रेवदंडा अर्बन बँकेची पोयनाड शाखा नव्या जागेत स्थलांतरित
अध्यक्ष व संचालक मंडळाच्या उपस्थितीत उत्साहात नूतन कार्यालयाचे उद्घाटन

रेवदंडा | महेंद्र खैरे

रेवदंडा को-ऑप. अर्बन बँकेची पोयनाड शाखा नव्या प्रशस्त जागेत स्थलांतरित करण्यात आली असून, नव्या कार्यालयाचा शुभारंभ बँकेचे अध्यक्ष व संचालक मंडळाच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

पोयनाड येथील हिरू दलाल नगर, हरिओम सोसायटी, गाळा क्र. २ येथे शाखेचे नूतन कार्यालय सुरू करण्यात आले. यानिमित्त आयोजित उद्घाटन समारंभात बँकेचे विद्यमान अध्यक्ष नजमूसाकिब म. अ. लांबाते यांच्या हस्ते फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी संचालक वामन काशिनाथ घरत, प्रभाकर धर्मा नाईक, महेंद्र वसंत पाटील, निलेश नारायण गाडे, सतीश नारायण लेले तसेच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश हिराजी माळी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी पोयनाड शाखेच्या शाखाधिकारी अर्चना राजेश गायकवाड तसेच कर्मचारी मनीष राजेंद्र घाटकर, श्रेया रामचंद्र केसरकर आणि रूपेश नरेश चवरकर यांनी अध्यक्ष, संचालक व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या प्रसंगी पोयनाड परिसरातील अनेक मान्यवर, ग्राहक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे बँकेच्या अध्यक्ष व संचालक मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. उपस्थितांनी नूतन शाखेला शुभेच्छा देत बँकेच्या भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

नवीन जागेत सुरू झालेल्या शाखेमुळे ग्राहकांना अधिक प्रशस्त, सुसज्ज व दर्जेदार बँकिंग सुविधा उपलब्ध होणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *