ताज्याघडामोडी

रेवदंड्यात श्री समर्थ चरणपादुका दर्शन सोहळा उत्साहात संपन्न

रेवदंड्यात श्री समर्थ चरणपादुका दर्शन सोहळा उत्साहात संपन्न

श्री मारुती देवस्थान व ब्राह्मण समाज रेवदंडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन; भाविकांनी घेतले चरणपादुकांचे दर्शन

रेवदंडा : महेंद्र खैरे

रेवदंडा येथील श्री मारुती देवस्थान व ब्राह्मण समाज रेवदंडा यांच्या संयुक्त विद्यमाने श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या श्री समर्थ चरणपादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन शनिवार, दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री मारुती देवस्थान, रेवदंडा पारनाका येथे करण्यात आले होते. या धार्मिक सोहळ्यात भाविकांनी श्री समर्थांच्या पवित्र चरणपादुकांचे दर्शन घेऊन भक्तिभावाने पूजा-अर्चा केली.

श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने रेवदंडा येथे आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. फुलांनी सजविलेल्या मंडपात श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या प्रतिमेसह चरणपादुकांची विधिवत पूजा करण्यात आली. उपस्थित भाविकांनी श्रद्धेने दर्शन घेतले.

श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या विचारांचा आणि भक्तिमार्गाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने या चरणपादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अशा धार्मिक उपक्रमांमुळे भाविकांना आध्यात्मिक समाधान मिळण्याबरोबरच समाजात भक्ती, संस्कार आणि धार्मिक परंपरांचे महत्त्व अधोरेखित होते.

या सोहळ्यास श्री मारुती देवस्थान व ब्राह्मण समाज रेवदंडा यांच्याशी संबंधित पदाधिकारी व भाविक उपस्थित होते. श्री समर्थांच्या चरणपादुकांचे दर्शन घेऊन भाविकांनी हा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात अनुभवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *