रेवदंडा येथे रायगड बाजारच्या ‘आपला बाजार’ शाखेचा शानदार शुभारंभ
रेवदंडा येथे रायगड बाजारच्या ‘आपला बाजार’ शाखेचा शानदार शुभारंभ
मान्यवरांच्या उपस्थितीत फीत कापून उद्घाटन; ग्राहकांना रास्त दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध होणार
रेवदंडा : महेंद्र खैरे
रेवदंडा पारनाका परिसरात रायगड बाजारच्या ‘आपला बाजार’ या नवीन शाखेचा शुभारंभ बुधवार, दि. २१ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा वाजता उत्साहात संपन्न झाला. या नवीन शाखेमुळे परिसरातील ग्राहकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू रास्त दरात उपलब्ध होणार आहेत.
या शुभारंभप्रसंगी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सदाशिव (दादा) मोरे, सुरेश खोत, शरद वरसोलकर, प्रमोद (बाळू) नवखारकर तसेच शेकापचे रेवदंडा शहर चिटणीस निलेश खोत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश खोत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून नवीन ‘आपला बाजार’ शाखेचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. तसेच आयोजकांच्या वतीने मान्यवरांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
नवीन शाखेच्या शुभारंभानिमित्त ‘आपला बाजार’मध्ये महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील नागरिक व ग्राहकांनी उपस्थिती दर्शविली.
या शाखेमध्ये कडधान्ये, धान्य, खाद्यतेल, मसाले यांसह दैनंदिन वापरातील विविध जीवनावश्यक वस्तू रास्त दरात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आली. स्थानिक ग्राहकांना एकाच ठिकाणी आवश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात आणि परवडणाऱ्या दरात खरेदी करता यावी, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
रेवदंडा पारनाका परिसरात सुरू झालेल्या या नवीन शाखेमुळे स्थानिक ग्राहकांना खरेदीसाठी आणखी एक सोयीचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
