रेवदंडा विभाग काँग्रेसचे उपाध्यक्ष अशिष गोंधळी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
रेवदंडा विभाग काँग्रेसचे उपाध्यक्ष अशिष गोंधळी यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
अलिबाग तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सुनील (आप्पा) थळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती
रेवदंडा : महेंद्र खैरे
रेवदंडा विभाग काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री. अशिष गोंधळी यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील (आप्पा) थळे यांच्यासह काँग्रेसचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवरांनी उपस्थित राहून गोंधळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुनील (आप्पा) थळे, माजी तालुकाध्यक्ष भास्कर चव्हाण, अलिबागचे नगरसेवक समीर ठाकूर, तालुका काँग्रेसचे सरचिटणीस जगदीश कवळे, स्वप्निल रानवडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी अशिष गोंधळी यांना निरोगी, आनंदी आणि यशस्वी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आपुलकीच्या वातावरणात शुभेच्छांची देवाणघेवाण करण्यात आली. काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे वाढदिवसाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
