ताज्याघडामोडी

रेवदंडयात अमृत पेठ दिवाळी शॉपिग महोत्सवाचा शानदार शुभारंभ

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; hdrForward: 0; highlight: false; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 46;
रेवदंडयात अमृत पेठ दिवाळी शॉपिग महोत्सवाचा शानदार शुभारंभ
अमृत पेठचे उदयोजक, महिलाचा कर्तृत्वाला चालना व आर्थिकतेला स्थिरता देणारे कार्य- भाजप महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा चित्रा पाटील
रेवदंडा-महेंद्र खैरे- रेवदंडा येथे महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधीनी अमृत पेठ च्या माध्यमातून थेट स्वदेशी बाजारपेठ उपलब्ध करणारा दिवाळी शॉपिंग महोत्सवाचा शानदार शुभारंभ मोठया उत्साहात पार पडला, या प्रसंगी अमृत पेठचे गावागावातील उदयोजकांना, महिलांचा कर्तृत्वाला व ग्रामीण आर्थिकतेला स्थिरता देणारे कार्य असे कौतुकास्पद उद्गार भाजप महिला मोर्चा दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्षा चित्रा पाटील यांनी काढले.
महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधीनी अमृत पेठ व चंपावती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. रेवदंडा यांचे सयुक्त विदयमाने दिवाळी सणानिमित्त रेवदंडा परिसरातील नागरिकांना खरेदीचा अनुभव मिळावा, तसेच स्थानिक उदयोजकाना व व्यावसायीकांना व्यवसायाची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने अमृत पेठ-थेट बाजारपेठ या भव्य दिवाळी शॉपिंग महोत्सवाचे आयोजन दि. 30 व 31 ऑक्टोबर व 1 नोव्हेबर 2026 या तिन दिवसांत काळभैरव मंदिर मैदान येथे करण्यात आले आहे. या महोत्सवात अनेक स्टॉलधारकांनी सहभाग नोंदविला असून अनेकविध वस्तू खरेदीची संधी नागरिक-ग्राहकवर्गास मिळाली आहे. दर्जेदार वस्तू थेट बाजारपेठेतून खरेदी करता याव्यात तसेच कुटूंबासह सणासुदीच्या खरेदीचा आनंद लुटता यावा या दृष्टीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; hdrForward: 0; highlight: false; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 44;
या अमृत पेठ दिवाळी शॉपिंग महोत्सवाचे शुभारंभ शुक्रवार दि. 30 ऑक्टोबर रोजी सायकांळी चार वाजता संपन्न झाला. प्रसंगी प्रमुख अतिथी भाजप उत्तर जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, भाजप दक्षिण जिल्हा महिला अध्यक्षा चित्रा पाटील, भाजप सरचिटणीस अँडव्होकेट महेश मोहिते, अमृत राज्य समन्वयक दिपक जोशी, अमृत विभाग व्यवस्थापक मंगेश खाडिलकर, अमृत विभाग व्यवस्थापक अमित सामंत, तसेच चंपावती पतसंस्था अध्यक्ष विश्वास जोशी, चंपावती पतसंस्था मुख्य प्रवर्तक दिलिप पटेल,अमृत रायगड जिल्हा व्यवस्थापक शैलेश मराठे, अमृत रायगड जिल्हा उपव्यवस्थापक मंगेश ढेबे, चंपावती पतसंस्था मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मानकर तसेच चंपावती पतसंस्था संचालक मंडळ, सर्व कर्मचारीवर्ग, बिंदुसागर प्रतिनिधी आदीची उपस्थिती होती.
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; hdrForward: 0; highlight: false; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 47;
प्रारंभी मुख्य अतिथी भाजप उत्तर जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, भाजप दक्षिण जिल्हा महिला अध्यक्षा चित्रा पाटील व अन्य मान्यवर यांचे उपस्थितीत फित कापून मृत पेठ दिवाळी शॉपिग महोत्सवाचा शानदार शुभारंभ करण्यात आला, त्यानंतर अविनाश कोळी, चित्रा पाटील व मान्यवर मंडळी यांनी महोत्सवातील स्टॉलधारकांना भेट दिली, व विक्रीस ठेवलेल्या अनेकविध वस्तूची पहाणी करून माहिती घेतली. त्यानंतर कार्यक्रमस्थळी व्यासपिठावर प्रमुख अत्ािथी व मान्यवर मंडळीचे प्रस्थान झाले, यावेळी भाजप उत्तर जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, भाजप दक्षिण जिल्हा महिला अध्यक्षा चित्रा पाटील व अन्य मान्यवर यांचे हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमृत रायगड जिल्हा व्यवस्थापक शैलेश मराठे यांनी केले तर, चंपावती पतसंस्थेचे अध्यक्ष विश्वास जोशी यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. यावेळी प्रमुख अतिथी चित्रा पाटील यांनी अमृत पेठ च्या माध्यमातून थेट स्वदेशी बाजारपेठ उपलब्ध करणारा दिवाळी शॉपिंग महोत्सवाचा शानदार शुभारंभ मोठया उत्साहात पार पडला, या प्रसंगी अमृत पेठचे गावागावातील उदयोजकांना, महिलांचा कर्तृत्वाला व ग्रामीण आर्थिकतेला स्थिरता देणारे कार्य असे कौतुकास्पद उद्गार काढले तसेच अमृतपेठ व चंपावती पतसंस्थेच्या कार्याचा अभिमान व्यक्त केला. तसेच उत्तर जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनी गावागावातील तालुक्यातील उत्पादनाला प्रसिध्द मिळवून देऊन बाजारपेठ उपल्ाब्ध करावी असे आवाहन केले तर पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे विकसीत व प्रगतशील भारताचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी गावागावातील उदयोजक व व्यवसायाना प्राधान्य दयावे असे म्हटले. शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार चंपावती पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मानकर यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *