सागवाडी ग्रामस्थांचा शिवसेना पक्ष प्रवेश कार्यक्रम उत्साहात
सागवाडी ग्रामस्थांचा शिवसेना पक्ष प्रवेश कार्यक्रम उत्साहात
विकास कामे करतो, मत परिवर्तन गरजेचे -आमदार महेंद्र दळवी
रेवदंडा-महेंद्र खैरे-बेलोशी ग्रामपंचायत अंतर्गत सागवाडी ग्रामस्थांचा शिवसेना पक्ष प्रवेश कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी मोठया संख्येने सागवाडी ग्रामस्थांनी शिवसेना पक्षात (शिंदे गटात) प्रवेश केला. शिवसेना मुरूड-अलिबाग आमदार महेंद्र दळवी यांनी त्याचे भगवी शाल परिधान करून स्वागत केले.
अलिबाग राजमळा येथील आमदार महेंद्र दळवी यांचे निवासस्थानी रविवार दि.25 ऑक्टोबर रोजी सायकांळी सहा वाजता बेलोशी ग्रामपंचायत अंतर्गत सागवाडी ग्रामस्थ असंख्य संख्येने उपस्थित होते. बेलोशी गण अलिबाग पंचायत समिती सदस्य संतोष निगडे यांचे प्रयत्नाने व पाठपुरावाने सागवाडी ग्रामस्थ पक्ष प्रवेश सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपिठावर आमदार महेंद्र दळवी यांचेसह पंचायत समिती सदस्य संतोष निगडे तसेच सागवाडी येथील सक्रिय कार्यकर्ते जानू नारायण शिद,देवजी नारायण शिद,काशिनाथ यशवंत पिंगळा,हरि काळया शिद,कृष्णा यशवंत पिंगळा,चांगू पांडू शिद, मधुकर यशवंत शिद, चाहया नारायण शिद,रामा धर्मा सोनार उपस्थित होते. 




