ताज्याघडामोडी

रेवदंड्यात प्रथमच ‘अमृत पेठ’ दिवाळी शॉपिंग महोत्सवाचे आयोजन

रेवदंड्यात प्रथमच ‘अमृत पेठ’ दिवाळी शॉपिंग महोत्सवाचे आयोजन

रेवदंडा येथे ३०, ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी भव्य दिवाळी खरेदी महोत्सव

रेवदंडा, प्रतिनिधी : दिवाळीच्या सणानिमित्त रेवदंडा परिसरातील नागरिकांना खरेदीचा अनोखा अनुभव मिळावा, तसेच स्थानिक उद्योजक आणि व्यावसायिकांना व्यवसायाची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ‘अमृत पेठ – थेट बाजारपेठ’ या भव्य दिवाळी शॉपिंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. रेवदंड्यात प्रथमच आयोजित करण्यात येणारा हा महोत्सव ३० व ३१ ऑक्टोबर तसेच १ नोव्हेंबर २०२६ या तीन दिवसांत हरेश्वर, कालभैरव मैदान, रेवदंडा बंदर, अलिबाग, रायगड येथे पार पडणार आहे.

या महोत्सवात दिवाळीनिमित्त विविध आकर्षक वस्तूंची खरेदी करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. दर्जेदार वस्तू थेट बाजारपेठेतून खरेदी करता याव्यात, तसेच कुटुंबीयांसह सणासुदीच्या खरेदीचा आनंद लुटता यावा, या दृष्टीने महोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे.

स्थानिक उद्योजक, व्यावसायिक आणि विक्रेत्यांना आपल्या उत्पादनांचे व वस्तूंचे प्रदर्शन करून विक्री करण्यासाठी हा महोत्सव महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. इच्छुक स्थानिक उद्योजकांनी महोत्सवात सहभागी होण्यासाठी आपले स्टॉल आगाऊ बुक करावेत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

हा महोत्सव दररोज सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क :

अमृत जिल्हा कार्यालय : ९११२२२८७५९

श्री. शैलेश मराठे : ९४२३८९२१८२

श्री. विजय मानकर : ९४२०६ ४७११९

‘अमृत पेठ – थेट बाजारपेठ’ या महोत्सवाच्या माध्यमातून दिवाळीची खरेदी, स्थानिक व्यावसायिकांना प्रोत्साहन आणि नागरिकांसाठी खरेदीचा आनंददायी अनुभव असा त्रिवेणी संगम साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *