महिलांसाठी आरोग्य शिबीर व सत्कार सोहळा
वाडगाव ग्रामपंचायतीत जागतीक महिला दिनाचे निमित्ताने
महिलांसाठी आरोग्य शिबीर व सत्कार सोहळा
रेवदंडा-महेंद्र खैरे-अलिबाग तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात अग्रक्रम असलेली तसेच अनेक पुरस्कार प्राप्त वाडगाव ग्रामपंचायतीत जागतिक महिला दिनाचे निमित्ताने महिलांसाठी आरोग्य शिबीर तसेच सत्कार सोहळयासह सामाजीक बांधिलकीतून हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वाडगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष व विद्यमान उपसरपंच जयेंद्र भगत यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम वेळोवेळी राबविण्यात येतात. जागतिक दिनाचे निमित्ताने महिलासाठी रविवार दि. 8 मार्च रोजी ॲनामिना प्रतिबंधक व हिमोग्लोबीन तपासणी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन वाडगाव येथील खासदार सुनिल तटकरे कुस्ती प्रशिक्षण केंद्र येथे सायकांळी चार वाजता घेण्यात आले. या आरोग्य तपासणी शिबीराचा वाडगाव ग्रामपंचायत हद्दीतील महिलांनी मोठया संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला. या आरोग्य शिबीरास समुदाय आरोग्य अधिकारी डाँ.स्मिता म्हात्रे, आरोग्य सेविका मनस्वी वाईरकर,आरोग्य सेवक रविंद्र पगारे, आरोग्य सेविका राखी धाटकर, आशा सेविका सिमा भगत, आशा सेविका श्वेता पाटील, मदतनिस मनिषा मोरे यांच्यासह सरपंच सारिका गणेश पवार, उपसरपंच जयेंद्र भगत, तसेच माजी सरपंच सरिता जयेंद्र भगत, ग्रा.प.सदस्या रूपाली प्रसाद पाटील, ग्रा.प.सदस्या निलम नरेश थळे, ग्रा.प.सदस्या शुंभागी मंगेश भगत, ग्रा.प.सदस्य मंगेश बोले यांनी विशेष परिश्रम घेतले.
तसेच महिला दिनाचे निमित्ताने सायकांळी सहा वाजता वाडगाव ग्रामपंचायत अंतर्गत विशेष क्रियाशिल असलेल्या महिलाचा सत्कार यावेळी करण्यात आला,
यावेळी राखी राजेंद्र धाटकर- आरोग्य सेविका, रसिका शैलेश सुतार -महाराष्ट्र पोलिस, विभा दिलिप मेहता-वकिल, समिता प्रकाश थळे-सरकारी कोर्ट न्यायालय, प्रेरणा प्रविण भगत-महसुल सहाय्यक, स्मिता सिताराम भगत-को.ए.सो. शाळा लायब्ररी शिक्षीका, जया विजयकुमार भगत -सिनियर के.जी. शिक्षीका, कल्पना रमेश भगत-माजी प्राथमिक शाळा शिक्षीका, शुभांगी संतोष भगत-आर.सी.एफ शिक्षीका, श्वेता जयेश गायकवाड -शिक्षीका, श्वेता सुरेश भगत ज्युनियम के.जी. शिक्षीका, ललिता अमित ठाकूर, शिक्षीका, स्मिता नंदकुमार थळे, शिक्षीका, अस्मिता संतोष सुतार-परिसेविका,सजाली अमित भगत -डॉक्टर, संजीवनी सुनिल थळे-शिक्षीका, कामिनी मंदारपाटील-शिक्षीका, ॠणाली भगत डेप्युटी मॅनेजर, आरती गणेश सुतार, व प्राची प्रदिप आंग्रे यांच्या विशेष्ा सत्कार वाडगाव ग्रामपंचायत सरपंच सारिका पवार, माजी सरपंच सरिता भगत व ग्रा.प.सदस्या रूपाली पाटील, निलेश थळे, शुभांगी भगत, आदीच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी उपस्थित जुईली दळवी-जुइकर, अस्मिता वार्डे, यांच्या सत्कार सुध्दा सरपंच सरिता भगत व माजी सरपंच सरिता भगत यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर उपसरपंच जयेंद भगत, माजी सरपंच नरेश थळै,माजी सरपंच मंगेश भगत, माजी सरपंच प्रसाद पाटील, रायगड भुषण-रमेश भगत, रायगड भुषण रमेश कडू आदीची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुरूवातीस आरोग्य शिबीरास उपस्थित जेष्ठ महिलांचा सत्कार तसेच सांगता समारंभ उपस्थित महिलांनी हळदी कुंकू समारंभाने करण्यात आली. कार्यक्रमांचे सुत्रसंचलन किरण भगत यांनी केले. 







