मुरूड पंचायत समिती सभापतीपदी निलेश घाटवळ तर उपसभापतीपदी आश्विनी जंगम यांची निवड
मुरूड पंचायत समिती सभापतीपदी निलेश घाटवळ तर उपसभापतीपदी आश्विनी जंगम यांची निवड ! शिवसेना शिंदे पक्षांचे निर्विवाद वर्चस्व
रेवदंडा-महेंद्र खैरे- मुरुड तालुका पंचायत समिती सभापती करिता शिवसेना शिंदे पक्षांचे उमेदवार निलेश शांताराम घाटवळ तर उपसभापती आश्विनी संजय जंगम यांची निवड झाल्याची घोषणा पिठासिन अधिकारी तथा तहसीलदार आदेश डफळ यांनी केली.
मुरूड पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ करिता ४ सदस्य पदाकरीता निवडणूक ७ फेब्रुवारी २०२६ ला तर ९ फेब्रुवारी निकाल जाहीर झाला यामध्ये शिंदे शिवसेना पक्षांचे ३ सदस्य तर भाजप पक्षाचे १ उमेदवार निवडून आले होते. या सदस्या मधुन सभापती व उपसभापती पदाकरिता जिल्हाधिकारी यांच्याकडुन निवडणूक जाहीर झाल्यानंतर आज मुरूड पंचायत समिती कार्यालयातील महाराष्ट्र भुषण आ.डाॅ.ति. श्री.नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात सभापती पदांसाठी उमेदवार शिवसेना शिंदे पक्षांकडून निलेश शांताराम घाटवळ व उपसभापती करिता अश्विनी संजय जंगम यांनी तर भाजप पक्षांकडून सभापती पदासाठी व उपसभापती पदाकरीता अश्विनी जयवंत ड़ोगरीकर यांनी आपला उमेदवारी अर्ज पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार-आदेश डफळ यांच्या कडे सुपुर्त करण्यात आला.
यावेळी पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार-आदेश डफळ,नायब तहसीलदार संजय तवर, पंचायत समिती गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ, महसूल सहाय्यक -प्रतिक पावसकर, सहाय्यक गटविकास अधिकारी -मंगेश पाटील आदिंसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
पिठासिन अधिकारी तथा तहसीलदार-आदेश डफळ यांनी चार ही अर्जाचे वाचन करण्यात आले,तद्नंतर अर्जाची छाननी केली असता शिवसेना शिंदे पक्षांचे सभापती पदाकरीता व उपसभापती पदाकरिता आलेले उमेदवाराचे अर्ज वैध ठरविले.तर भाजप पक्षांकडून अश्विनी जयवंत ड़ोगरीकर यांनी सभापती व उपसभापती पदाकरीता आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.परंतु उमेदवारी अर्जावर असलेल्या सुचकांच्या जागेवर उमेदवार यांनी स्वतः सही केल्याने दोन्ही उमेदवारी अर्ज पिठासिन अधिकारी तथा तहसीलदार-आदेश डफळ यांनी अवैध ठरविले.यामुळे वैद्य अर्जापैकी सभापती पदासाठी शिंदे शिवसेना पक्षांकडून निलेश शांताराम घाटवळ व उपसभापती पदाकरीता अश्विनी संजय जंगम यांना विजयी घोषित केले.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख भरत बेलोसे, महिला जिल्हा संघटक तृप्ती पाटील, विधानसभा संघटक ऋषिकांत डोंगरीकर, उपतालुकाप्रमुख भगीरथ पाटील, तालुका संघटक यशवंत पाटील, उपविभाग प्रमुख सुरेश ठाकूर, तालुका महिला संघटिका मंदाताई ठाकूर, ज्येष्ठ कार्यकर्ते सी.एम.ठाकूर, बांधकाम कामगार संघटक दिनेश मिणमिणे, माजी सभापती रमेश उर्फ बाबू नागावकर, माजी उपसभापती चंद्रकांत मोहिते, दिपेश वरणकर, चंद्रकांत वाघे, संतोष राणे, निर्मला म्हात्रे, वैशाली रोटकर, नगरपरिषद उपनगराध्यक्ष विरेंद्र भगत, संदीप पाटील यांसह तमाम शिवसैनिक व सर्व उपस्थितांनी सभापतीपदी निलेश घाटवळ व उपसभापतीपदी आश्विनी जंगम यांची निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करुन पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.







