ताज्याघडामोडी

रेवदंडयातील महिला दिन उत्साहात, कार्यकुशल महिलांचा सत्कार

रेवदंडयातील महिला दिन उत्साहात, कार्यकुशल महिलांचा सत्कार
फॅशन शो व ऑर्केस्ट्रासह महिलांसाठी लकी ड्राँ, मान्यवर मंडळीची उपस्थिती
रेवदंडा-महेंद्र खैरे- जागतिक महिला दिनाचे निमित्ताने रेवदंडयामध्ये महिला दिन मोठया उत्साहात साजरा झाला. या निमित्त कार्यकुशल महिलांच्या सत्कार, फॅशन शो,व ऑकेस्ट्राची धुम यामुळे दिमाखदार कार्यक्रम वेगळीच छाप पाडून गेला. या कार्यक्रमांस मान्यवर मंडळीच्या उपस्थितीस बहुसंख्येने महिलावर्गाची उपस्थिती लक्ष्यणीय ठरली.
रेवदंडयातील व्यापारी अमित रघुनाथ म्हात्रे यांचे संकल्पनेतून व जागतिक महिला दिनाचे निमित्ताने दि. 8 मार्च रोजी रेवदंडा को.ए.सो.हायस्कुलच्या प्रांगणात सायकांळी पल्लवी अमित म्हात्रे यांनी महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास नवनिर्वाचीत जि.प.सदस्य सचिन राउळ, पं.स.सदस्य शरद गोंधळी, सरपंच रेवदंडा ग्रा.प. प्रफुल्ल मोरे, माजी जि.प.सदस्य बाळाशेठ तेलंगे,प्रसाद गोंधळी, भारती मोरे, शलाका राउत, तसेच शिवसेना उबाठा माजी जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, चौल माजी सरपंच रूपाली म्हात्रे, रेवदंडा ग्रा.प. माजी सरपंच सोनाली मोरे, यांच्यासह शेकापक्षाच्या सोशल मिडिया प्रमुख चित्रलेखा पाटील व शिवसेना महिला आघाडी प्रमुख संजिवनी नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आली, त्यानंतर स्वागत गीत, गणेशाचे नमन आदी नंतर मान्यवर मंडळीचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजक पल्लवी म्हात्रे व व्यवस्थापक अमित म्हात्रे या व्दयीचे हस्ते पुष्पगूच्छ प्रदान करून करण्यात आले. यावेळी रेवदंडयातील माजी सरपंच व माजी पं.स.सदस्या सरोज वरसोलकर, भाजी विक्रेत्या नुरजॅहा हुसेन बुऱ्हान, हर्षदा धुमाळ, रिया झावरे, चौल येथील अश्विनी राउत, रेखा घरत या कार्यकुशल महिलांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करून करण्यात आले.
रेवदंडयातील व्यापारी अमित म्हात्रे यांचे संकल्पनेतून कला व संस्कृतीचा संगम पेश करताना, रायगड जिल्हातील 11 प्रसिध्द मॉडेल्सचा पारंपारीक मराठमोळा फॅशन शो, पारंपारीक मराठी वेशभुषा,तसेच कलाधारा ज्वेलरी तर्फे दागिनाची सजावट, तसेच कॉस्टयुम डिझायनर लक्ष्मी मुकादम यांनी पेश केलेला पारंपारीक पोशाख प्रेक्षकांच्या पंसतीस उतरले तर मॉडेल्सचा आकर्षक हेअर व मेकअप युगाज सलोन यांनी केला होता. यावेळी फॅशन शो चे दिग्दर्शन आंतरराष्ट्रीय कोरिओग्राफर जयेश पाटील यांनी केले होते तर प्रितम सुतार यांच्या आवाजातील जादूने संपुर्ण कार्यक्रम उल्हासितपणे पार पडला.
यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या महिलानी उत्स्फुर्तपणे प्रतिसाद देवून कार्यक्रमाची रंगत वाढविली.स्पर्धेतील तिन्ही विजेत्याना पैठणीने सन्मानित करण्यात आले. महिलांचा सन्मान व आत्मविश्वास वाढविण्यासाठी सदर कार्यक्रमाचे नियोजन असल्याचे कार्यक्रमाचे व्यवस्थापक अमित म्हात्रे यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *