मध्ये भव्य मोफत नेत्र चिकित्सा, नेत्र शस्त्रक्रिया, व चष्मा वाटप शिबीर

मुरूड मध्ये भव्य मोफत नेत्र चिकित्सा, नेत्र शस्त्रक्रिया, व चष्मा वाटप शिबीर
जिल्हा सरचिटणीस अँड महेश मोहिते व महिला जिल्हा उपाध्यक्षा अँड मनस्वी मोहिते यांचे स्तुत्य उपक्रमाने
भाजप आमदार विक्रांत पाटील व जिल्हा संघटक सतिश धारप यांची सदिच्छा भेट
रेवदंडा-महेंद्र खैरे- महाराष्टाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वाढदिवसाचे निमित्ताने मुरूड तालुक्यात आमली येथे सामाजीक बांधिलकी जपत भव्य मोफत नेत्र चिकित्सा, नेत्र शस्त्रक्रिया, व चष्मा वाटप शिबीर भाजप दक्षिण जिल्हा सरचिटणीस अँड महेश मोहिते व महिला जिल्हा उपाध्यक्ष अँड मनस्वी मोहिते यांचे स्तुत्य उपक्रमाने घेण्यात आला, या शिबीरास पंचक्रोशीतील गरजूचा मोठा प्रतिसाद लाभला.
मुरूड तालुक्यातील आमली, एच.पी.पेट्रोल पंपा जवळील भाजप कार्यालयात बुधवार दि. 22 जुलै 2026 रोजी सकाळी 10 ते सायकांळी 5 वाजेपर्यंत हे भव्य मोफत नेत्र चिकित्सा, नेत्र शस्त्रक्रिया, व चष्मा वाटप शिबीर संपन्न झाले. या शिबीरास सकाळी 10.00 वाजता जिल्हा सरचिटणीस अँड महेश मोहिते व महिला जिल्हा उपाध्यक्षा अँड मनस्वी मोहिते यांचे हस्ते फित कापून व श्रीफळ वाढवून प्रारंभ झाला. यावेळी भाजप पंचायत समिती सदस्या अश्विनी मोहनिश ठाकूर, मिठेखार ग्रा.प.सरपंच अशोक वाघमारे, साळाव ग्रा.प.सदस्या शितल वाणी, कार्यकर्ते महेंद्र चौलकर, लियाकत खोत, राजेंद्र सुतार, संदिप चिरायू, विनायक कांबळी, भतर जोशी, प्रशांत भोय, निलेश चवरकर, गणेश कट, हरेश पाटील, भारत सावंत, ओदश माळी, नितिन आर्डे, दिपक चोरडेकर, मिठेखार ग्रा.प. माजी सरपंच सुवर्णा चवरकर, आदी भाजप कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. 

