ताज्याघडामोडी

रेवदंडा पागार मोहल्ला येथे पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया

रेवदंडा पागार मोहल्ला येथे पाईप लाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया
संबधीताकडे तक्रार करून सुध्दा दुर्लक्ष-सलिमभाई तांडेल यांची संप्तत प्रतिक्रिया
रेवदंडा-महेंद खैरे-रेवदंडा पागार मोहल्ला येथे गेल्या महिन्यात पाईप लाईन फुटून आजतागायत हजारो लिटर पाणी वाया गेले असल्याचा आरोप सामाजीक कार्यकर्ते सलिमभाई तांडेल यांनी केला आहे. शिवाय संबधीताकडे तक्रार करून सुध्दा दुर्लक्ष होत असल्याने संप्तत प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
उमटे पाणी पुवठा योजनेअंतर्गत पाणी पुरवठा पाईप लाईन व्दारे पागार मोहल्ला येथे घरोघरी होत आहे, येथील चौकात मिठकर गल्लीत गेल्या महिन्यापासून या पाणीपुरवठयाची पाईल लाईन फुटली आहे, व या फुटलेल्या पाईप लाईन मधून हजारो लिटर पाणी आजतागायत वाया गेले असल्याचे स्थानिक रहिवाशी व सामाजीक कार्यकर्ते सलिमभाई तांडेल यांनी सांगितले. सदर फुटलेल्या पाईप लाईन बाबत संबधीताकडे तक्रार करून सुध्दा दुर्लक्ष केले जात असल्याने त्यांनी संप्तत प्रतिक्रिया व्यक्त केली. सदर फुटलेल्या पाईप लाईन मधून गेल्या महिन्यापासून पाणी वाहत आहे, व सदर पाणी वाहत असल्याने परिसर चिखलमय झाला असून जा-ये करणारे पादचारी, वाहने यांना सुध्दा यामधूनच वाटचाल करावी लागते.
गेल्या महिन्यात सदर पाईप लाईन फुटून पाणी वाया जात आहे. संबधीताकडे याबाबत तक्रार करून सुध्दा दुर्लक्ष केले जात आहे, निदान वाहत असलेले पाणी तात्पुरते बंद तरी करावे जेणेकरून पाणी वाया जाणार नाही असेही सलिमभाई तांडेल यांनी म्हटले. गेल्या महिन्यात सदर पाईप लाईन फुटून पाणी वाया जात आहे. अश्यारितीने पाणी वाया जात असल्याने उन्हाळयांत पाण्याची टंचाई ही समस्या नित्याची आहे. मात्र संबधीत याबाबत कोणतीही ठोस भुमिका न घेता, विनाकारण पाणी वाया घालवित असल्याचे चित्र दिसते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *