ताज्याघडामोडी

रायगड जिल्हा निराधार सेनेचे अध्यक्ष भास्कर गव्हाणे यांची समाजभूषण पुरस्कारासाठी निवड

रायगड जिल्हा निराधार सेनेचे अध्यक्ष भास्कर गव्हाणे यांची समाजभूषण पुरस्कारासाठी निवड
संविधान गौरव सोहळ्यात २८ नोव्हेंबर रोजी मुंबईत होणार राज्यस्तरीय पुरस्कार वितरण
रेवदंडा – महेंद्र खैरे : महाराष्ट्र प्रदेश निराधार सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष भास्कर गव्हाणे यांची त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मंत्रालय वार्ता, मुंबई यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या संविधान गौरव सोहळा व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभात भास्कर गव्हाणे यांना हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. शनिवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता मुंबईतील मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे हा सोहळा पार पडणार आहे.

या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णु देव वर्मा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे निमंत्रण पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

भास्कर गव्हाणे यांनी रायगड जिल्ह्यात सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव होणे ही रायगड जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.

महाराष्ट्र प्रदेश निराधार सेनेच्या वतीनेही या निवडीबद्दल भास्कर गव्हाणे यांचे अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

रायगडच्या सामाजिक क्षेत्रात मानाचा सन्मान मिळाल्याने भास्कर गव्हाणे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *