रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या आजीव सभासदपदी डॉ. सचिन राऊळ यांची निवड
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या आजीव सभासदपदी डॉ. सचिन राऊळ यांची निवड
पेण येथे वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात; खेळाडू व पंच परीक्षार्थींचा गौरव
रेवदंडा – महेंद्र खैरे : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा पेण येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेमध्ये असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील आणि सचिव प्रदीप नाईक यांच्या हस्ते विविध वयोगटांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित पंच परीक्षा आणि गुणलेखक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थींचा सन्मान करण्यात आला.
या सभेचे नेटके आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आश्रयदाते आणि आजीव सभासदांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यामध्ये रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य डॉ. सचिन शरद राऊळ यांना जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे आजीव सभासदत्व प्रदान करण्यात आले. त्यांच्या या समावेशामुळे रायगड जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींनी आनंद व्यक्त केला आहे.
डॉ. सचिन राऊळ यांना स्वतः क्रिकेटची विशेष आवड असून त्यांनी अनेक वर्षे लेदर बॉल क्रिकेटमध्ये विविध संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे. तसेच मागील अनेक वर्षांपासून त्यांनी विविध क्रिकेट स्पर्धांमध्ये स्थानिक मुलांना संधी देत स्वतःचे संघ मैदानात उतरवले आहेत. त्यांच्या संघांनी अनेक स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत बक्षिसेही पटकावली आहेत.
रायगड जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी, विशेषतः क्रिकेट विश्वात अलिबागसह संपूर्ण जिल्ह्याची प्रगती साधण्यासाठी सुसज्ज क्रिकेट मैदान आणि खेळाडूंना आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे डॉ. सचिन राऊळ यांनी















