चौलमध्ये ज्येष्ठांचा सन्मान आणि समाजभान कार्यकर्तृत्व पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

चौलमध्ये ज्येष्ठांचा सन्मान आणि समाजभान कार्यकर्तृत्व पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न
रेवदंडा – महेंद्र खैरे : चौल-बेलाई येथे अमृत महोत्सवी वयोमान पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान तसेच समाजभान जपणाऱ्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांना कार्यकर्तृत्व पुरस्कार प्रदान करण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. नारायण नाईक प्रतिष्ठान आणि उत्कर्ष महिला मंडळ, चौल-बेलाई यांच्या संयुक्त विद्यमाने कै. नारायण (भाऊ) नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी वस्तुत्व लॉन अँड रिसॉर्ट, चौल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


[caption id="attachment_2862" align="aligncenter" width="2560"]
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; hdrForward: 0; highlight: false; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 45;x: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 45;[/caption]यावेळी प्रमुख अतिथी सिरत सातपुते यांनी आपल्या मनोगतात विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या वृक्षतोडीबाबत आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, शासनाचे मोठे प्रकल्प उभारताना शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा आणि जंगलांचेही नुकसान होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असून या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होता कामा नये. कर्जत आणि सह्याद्री परिसरातील प्रस्तावित प्रकल्प महाराष्ट्रासाठी घातक ठरू शकतात. वाढवण बंदर प्रकल्पामुळे बाधित नागरिक समुद्राच्या पाण्यात दिवसभर उभे राहून आंदोलन करत असतानाही शासनाने त्याकडे दुर्लक्ष करणे चिंताजनक आहे, असे त्यांनी नमूद केले.
शेतकरी, जागरूक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि विशेषतः नव्या पिढीतील युवकांनी शेती, पर्यावरण आणि जंगलांचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमात अश्विनी मनोज म्हात्रे यांच्या संपादकीय संकल्पनेतून साकारलेल्या ‘काव्यसरी’ दिवाळी विशेषांक २०२६ चे प्रकाशन सिरत सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नारायण नाईक प्रतिष्ठानचे विश्वस्त तथा नायब तहसीलदार प्रभाकर नाईक, महेंद्र नाईक, मंगेश नाईक, नंदकुमार नाईक, ललिता म्हात्रे, राजश्री नाईक, भक्ती रानवडे तसेच संयोजन समितीचे सदस्य हरिश्चंद्र म्हात्रे, मदन ठाकूर, सुधाकर राऊळ, जयवंत कंटक आणि हर्षला म्हात्रे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रितम सुतार यांनी केले.
ज्येष्ठांचा सन्मान, समाजसेवकांच्या कार्याचा गौरव आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश अशा त्रिसूत्रीमुळे हा सोहळा संस्मरणीय ठरला.












