रेवदंडा येथील कुस्ती स्पर्धेत बेलोशी आखाडा प्रथम क्रमांकाचा विजेता
रेवदंडा येथील कुस्ती स्पर्धेत बेलोशी आखाडा प्रथम क्रमांकाचा विजेता
व्दितीय क्रमांक वाडगाव, तृतीय क्रमांक आंदोशी आखाडे विजेते
रेवदंडा-महेंद्र खैरे- सालाबाद प्रमाणे लक्ष्मी पुजनाचे निमित्ताने श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडळ चौल-रेवदंडा यांचे वतीने आयोजीत कुस्ती स्पर्धेत बेलोशी आखाडा प्रथम क्रमांकाचा विजेता ठरला तर व्दितीय क्रमांक वाडगाव आखाडा, तृतीय क्रमांक आंदोशी आखाडा यांनी पटकाविले.
रेवदंडा को.ए.सो.हायस्कुलच्या पटांगात दुपारी तिन वाजता कुस्ती स्पर्धेस प्रारंभ झाला. यावेळी शेकापक्षाचे अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत यांच्या प्रमुख उपस्थितीसह अलिबाग तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष जयेंद्र भगत,श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडळ चौल-रेवदंडा अध्यक्ष सुरेश खोत, सेक्रेटरी शरद वरसोलकर, खजिनदार हेमंत गणपत, शेकापक्ष रेवदंडा शहर चिटणीस हेमंत गणपत, विनायक खोपकर, संदिप खोत, भगवान नाईक, विलास पाटील, प्रमोद नवखारकर, नितिन ठाकूर,महेश ठाकूर, राहूल हेमंत गणपत आदीच्ाी उपस्थिती होती. या निमित्ताने शेकापक्ष तालुका चिटणीस यांचे हस्ते श्री मारूतीरायांची प्रतिमेची पुजाअर्चा तसेच कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष जयेंद्र भगत व उपस्थ्ाित मान्यवर यांचे हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले, तर सलामीची लढतीचा शुभारंभ मंडळाचे अध्यक्ष सुरेश खोत यांचे हस्ते करण्यात आले. या कुस्ती स्पर्धेत माजी जि.प.सदस्य व्दारकानाथ नाईक, शिवसेना उबाठा दक्षिण जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, अरविंद्र शिवलकर, प्रमोद भगत, आदी मान्यवरांनी भेट दिली. स्पर्धा नारळावर घेण्यात आली,
स्पर्धेचे पंच म्हणून रविंद्र घासे, सुधाकर पाटील, वासुदेव पाटील, मिंलिद भगत यांनी काम पाहिले तर रेवदंडा शेकापक्ष शहर चिटणीस निलेश खोत यांचेसह मंडळाचे सदस्य महेश ठाकूर, मधुकर फुंडे, रोहिदास मानकर, शरद पाटील, चंद्रकांत धाटावकर, नितिन ठाकूर, राजन कोतवडेकर, जयंत शिंदे, प्रमोद नवखारकर यांनी विशेष परिश्रम घेतले. कुस्ती स्पर्धेचे धावते समालोचन व सुत्रसंचलन सुनिल थळे, निलेश खोत, राजू नाईक यांनी केले. या कुस्ती स्पर्धेस शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी रूपये दहा हजार तर प्रथम,व्दितीय,तृतीय क्रमांकाच्या विजेत्यासाठी पै.इनुस तांडेल यांच्या स्मरणार्थ खलिल तांडेल यांनी चषक दिले, तर पै. गफुर फकरूद्दीन लांबाते यांच्या स्मरणार्थ अस्लम लांबाते यांनी प्रथम क्रमांकास रोख एक हजार एकशे एक रोख रक्कमेचे बक्षिस दिले.












