महाजने दिविवाडी येथे नवीन अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन; निवारा शेड व काँक्रिट रस्त्याचेही लोकार्पण
महाजने दिविवाडी येथे नवीन अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन; निवारा शेड व काँक्रिट रस्त्याचेही लोकार्पण आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती सदस्य संतोष निगडे यांच्या प्रयत्नांना यश; ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण
रेवदंडा-प्रतिनिधी : महाजने दिविवाडी येथे नवीन अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन तसेच महाजनाई देवी मंदिराशेजारी उभारण्यात आलेल्या निवारा शेड आणि नितेश भोपी यांच्या घराजवळील काँक्रिट रस्त्याचे लोकार्पण शुक्रवार, दिनांक ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता उत्साहात पार पडले. या लोकाभिमुख विकासकामांमुळे परिसरातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या आदेशाने, अलिबाग पंचायत समितीचे सदस्य संतोष चंद्रकांत निगडे यांच्या प्रयत्नातून आणि श्री. प्रितेश प्रकाश पारंगे यांच्या मागणीनुसार महाजने दिविवाडी येथे नवीन अंगणवाडी इमारतीचे बांधकाम करण्यात आले. सन २०२४-२५ च्या निधीतून हे काम पूर्ण करण्यात आले.
या उद्घाटन व लोकार्पण सोहळ्याला रायगड जिल्हा परिषद सदस्य अनंतराव गोंधळी, पंचायत समिती सदस्य संतोष चंद्रकांत निगडे, को. यो. सो. बेलोशी हायस्कूलचे माजी चेअरमन दत्तात्रेय भोपी, शिवसेना नेते जयवंत थळे, बेलोशी ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच शालिनी संतोष निगडे, शिवसेना महाजने शाखाप्रमुख कृष्णा यशवंत पारंगे, शिवसेना गटप्रमुख मंगेश गुंड यांच्यासह सदानंद नाईक, जयवंत पारंगे, पंढरीनाथ पारंगे, अनिल गावंड, विशाल आरकशी, नितीन गावंड, देवदास राऊत, मंदार मिसाळ, सादेव पारंगे, मिलिंद पारंगे, सुहास गावंड, नितेश भोपी, प्रसाद पारंगे, अमोल पारंगे, जयदास पारंगे, धनेश ठाकूर, शांताराम नाईक, मुना नाईक आणि संदेश नाईक आदी मान्यवर उपस्थित होते




