कोर्लई येथे भीषण पाणी टंचाई; ग्रामस्थांचे बेहाल, ग्रामपंचायतीत सरपंचाचा संवाद-चर्चा
कोर्लई येथे भीषण पाणी टंचाई; ग्रामस्थांचे बेहाल, ग्रामपंचायतीत सरपंचाचा संवाद-चर्चा
मुख्यः रस्ता नुतनीकरणात पाईपलाईन फुटल्याने समस्या -सरपंच राजश्री मिसाळ
रेवदंडा-महेंद्र खैरे- मुरूड तालुक्यातील कोर्लई गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून गेले महिनाभर पाण्यावाचून ग्रामस्थांचे बेहाल झाले आहे. याबाबत कोर्लई ख्रिश्चनपाडा ग्रामस्थाची कोर्लई ग्रामपंचायतीत संवाद-चर्चा घडून आली. े.
कोर्लई गावात गेल्या महिनाभरात भीषण पाणी टंचाईस सामोरे जावे लागत असून काही वर्षापुर्वी नव्याने जलजीवन पाणी पुरवठा योजना कार्यन्वित करण्यात आली आहे, कोर्लई गावात जनजीवन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाणी पुरवठा फणसाड धरणातून केला जातो. सध्यस्थितीत मुरूड तालुक्यातून कोर्लई येथील मुख्यः रस्तावर रेवस-रेड्डी अंतर्गत रस्त्याचे नुतनीकरण, क्रॉकिटीकरण व रूंदीकरणाचे काम सुरू आहे. तसेच मांडळा ते फणसाड धरण या मार्गात सुध्दा अनेक ठिकाणी नुतन रस्तासाठी खोदाई वर्गेरे कामे करण्यात आली आहेत. यामध्ये रस्ता रूंदीकरणख् क्रॉकिटीकरण व नुतनीकरण कामात खोदाई काम करताना ठेकेदारांच्या निष्काळजीपणाने ठिकठिकाणी जनजीवन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत असलेली पाईप लाईन फुटली गेली. या फुटलेल्या पाईप लाईनची तात्पुरती दुरूस्ती केली जाते, परंतू फुटलेल्या पाईपलाईन मधून पाणी झिरपत रहाते, परिणाम कोर्लई गावापर्यंत पाण्याचा प्रेशर पाणी पुरवठा करण्यास सुयोग्य होत नसल्याने कोर्लई गावात पाणी मिळत नाही. यामुळे एकप्रकारे कुत्रीम पाणी टंचाई कोर्लई गावात निर्माण झाली आहे.
अखेर या पाणी टंचाई समस्येवर कोर्लई ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामस्थ यांच्यामध्ये संवाद-चर्चा घडुुन आली. यावेळी ग्रामस्थांनी सरपंच राजश्री मिसाळ यांचेकडे पाणी समस्येविषयी गाऱ्हाणे मांडले, यावेळी सरपंच राजश्री मिसाळ यांनी सध्यस्थितीत मुरूड तालुक्यातून कोर्लई येथील मुख्यः रस्तावर रेवस-रेड्डी अंतर्गत रस्त्याचे नुतनीकरण, क्रॉकिटीकरण व रूंदीकरचे काम सुरू आहे. तसेच मांडळा ते फणसाड धरण या मार्गात सुध्दा अनेक ठिकाणी नुतन रस्तासाठी खोदाई वर्गेरे कामे करण्यात आली आहेत. यामध्ये रस्ता रूंदीकरणख् क्रॉकिटीकरण व नुतनीकरण कामात खोदाई काम करताना ठेकेदारांच्या निष्काळजीपणाने ठिकठिकाणी जनजीवन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत असलेली पाईप लाईन फुटली गेली. या फुटलेल्या पाईप लाईनची तात्पुरती दुरूस्ती केली जाते, परिणाम कोर्लई गावापर्यंत पाण्याचा प्रेशर पाणी पुरवठा होत नसल्याचे म्हटले.
दरम्यान कोर्लई ख्रिश्चनपाडा येथील ग्रामस्थ व शिवसेना युवासेना उपतालुका प्रमुख विकी वेगस यांनी संबधीत खात्याना कोर्लई गावातील पाणी पुरवठा समस्येबाबत पत्र दिले आहे. संबधीतानी त्वरीत लक्ष्य देवून पाणी पुरवठा व्यवस्थीत व सुरळीत करण्यासाठी रस्ता नुतनीकरणाने व रूंदीकरणात पाईप लाईन विस्कळीत झाल्याने नव्याने पाईप लाईन करण्यात यावी अशी मागणी कोर्लई सरपंच राजश्री मिसाळ यांनी केली आहे. दरम्यान कोर्लई ग्रामपंचायतीचे वतीने ख्रिश्चनपाडा ग्रामस्थांना टॅकरने पाणी पुरवठा कोर्लई ग्रामपंचायत मार्फत करण्यात येत असल्याचा खुलासा सरपंच राजश्री मिसाळ यांनी केला.


