गावागावातील अंतर्गत रस्ते,पाईप लाईन, बसस्टॉपची दुरावस्था

मुख्य रस्ता रूंदीकरण व कांक्रिटीकरणासह नुतनीकरणात दुरावस्था – ग्रामस्थांची संप्तत प्रतिक्रिया
रेवदंडा-महेंद्र खैरे- मुरूड तालुक्यात साळाव ते तळेखार रस्ता रूंदीकरण व कांक्रिटीकरणासह नुतनीकरणात गावागावातील अंतर्गत रस्ते,पाईप लाईन, बसस्टॉपची दुरावस्था झाली आहे, सदर बाबी संबधीताशी चर्चा व संवाद साधून सुध्दा कोणताही प्रतिसाद दिला जात नसल्याने साळाव ते तळेखार यामधील गावागावातील ग्रामस्थ संप्तत प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत.
साळाव ते तळेखार मधील रस्ता रूंदीकरण,कॉक्रिटीरणासह नुतनीकरणाचे काम आटोक्यात आले असल्याचे निदर्शनास येते. साळाव ते तळेखार मुख्यः रस्त्यातील वळके ग्रामपंचायत हद्दीतील सार्तिर्डे येथील मुख्य रस्ताचे रूंदीकरण,कॉक्रिटीरणासह नुतनीकरणाचे काम सुध्दा पुर्ण झाल्याचे दिसते. सार्तिर्डे गाव मुख्यः रस्ता कांक्रिटीकरणासह रूंदीकरणात पुर्वी असलेल्या चढाव दुर करण्यात आला आहे, त्यामुळे या रस्त्याची खोदाई करण्यात आली, या खोदाई कामात सार्तिर्डे मुख्यः रस्तातील बसस्टॉपची दुरावस्था झाली आहे, या बसस्टॉपला बसण्यासाठी जाणे-येण्याची समस्या निर्माण झाली आहे, त्यामुळे बसस्टॉप असून नसल्यासारखा झाला असून प्रवासीवर्गास त्रासदायक ठरत आहे. तसेच सार्तिर्डे गावात जाण्यासाठी असलेल्या अंतर्गत रस्ताची रूंदीकरण,कॉक्रिटीरणासह नुतनीकरणात दुरावस्था झाली आहे. तसेच सार्तिर्डे गावाला पाणी पुरवठा करणारी पाईप लाईन सुध्दा या कामामध्ये तोडफोड झाली असून सार्तिर्डे ग्रामस्थांना पाण्याची समस्या निर्माण झाली आहे, अशी तक्रार सार्तिर्डे ग्रामस्थ करत आहेत. सदर रस्ता रूंदीकरण,कॉक्रिटीरणासह नुतनीकरणाचे काम एमएसआयडिसी मार्फत करण्यात आले करण्यात येत असल्याचे ग्रामस्थांचे वतीने सांगण्यात आले.
सार्तिर्डे गावातील अंतर्गत रस्ते,पाईप लाईन, बसस्टॉपची मुख्य रस्ता रूंदीकरण व कांक्रिटीकरणासह नुतनीकरणात झालेल्या दुरावस्थेबाबत संबधीत ठेकेदाराशी चर्चा व संवाद केला, व सार्तिर्डे गावातील अंतर्गत रस्ता,पाईप लाईन, बसस्टॉपची तातडीने दुरूस्ती करावी अशी मागणी केली, मात्र सदर बाबत कोणताही प्रतिसाद संबधीत देत नसल्याचे सार्तिर्डे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संबधीत ठेकेदारानी तातडीने सार्तिर्डे गावातील अंतर्गत रस्ता,पाईप लाईन, बसस्टॉपची दुरूस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे, अन्यथा रास्ता रोको आदी प्रकारे आंदोलन हाती घेण्याचा इशारा सार्तिर्डे ग्रामस्थांनी दिला आहे.
साळाव ते तळेखार मधील सार्तिर्डेसह शिरगाव, मिठेखार आदी गावाच्या मुख्य रस्तातील रूंदीकरण व कांक्रिटीकरणासह नुतनीकरणात दुरावस्था झाल्याची तक्रार ग्रामस्थ करत आहेत.
