चौल आग्राव रस्ता नुतनीकरण संथ गतीने
चौल आग्राव रस्ता नुतनीकरण संथ गतीने
विदयार्थ्यी, ग्रामस्थ, प्रवासीवर्ग यांचे बेहाल, ठेकेदाराची मनमानी
रेवदंडा-महेंद्र खैरे- चौल आग्राव रस्ता नुतनीकरणास प्रारंभ झाला, काही ठिकाणी क्रॉकिटीकरण सुध्दा झाले, मात्र या कामासाठी अनेक ठिकाणी रस्ता खोदाई सुध्दा करण्यात आली आहे. सदर काम हे अत्यंत संथ गतीने होत असून चौल-आग्राव पंचक्रोशीतील विदयार्थी, ग्रामस्थ व प्रवासीवर्ग यांचे बेहाल होत आहे. एकूणच दोन वर्षापुर्वी मंजूर निधीचे काम ठेकेदार वेळेत काम पुर्ण न करता मनमानी करत असल्याची संप्तत प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
चौल-आग्राव रस्ताला निधी मंजूर होवून दोन वर्ष उलटले, गेल्या वर्षी जानेवारी मध्ये काम सुरू करण्याची ठेकेदाराला निविदा प्राप्त झाली होती, परंतू तेव्हाही काम सुरू करण्यात आले नाही, पर्यायी रस्ता नसल्याने ऐन पावसाळयात सुध्दा काम पुर्ण करता आले नाही, दिवाळी पुर्वी सुरू झालेले चौल-आग्राव नुतन क्रॉकिटीकरणाचा रस्ता सहा महिने उलटून गेले तरी अदयापी पुर्तता केली जात नाही. संबधीत ठेकेदार या कामात दिरंगाई करत असल्याचा आरोप सर्व थरातून होत आहे.
चौल-आग्राव रस्ता नुतनीकरणाने आग्राव-अलिबाग एस.टी. बसेस बंद असल्याने विदयार्थीवर्गाचे खुप हाल होत आहेत, तसेच ग्रामस्थ व प्रवासीवर्ग यांचेही बेहाल झाले आहे. रस्ताचे कामाची पुर्तता न झाल्याने ठिकठिकाणी ठेकेदारानी मटेरीयल रस्तात टाकले असल्याचे तेथे दोन चाकी, तिन चाकी वाहनाच्या अपघातास निमत्रंण ठरत आहे.
एकूणच ठेकेदाराच्या मनमानीने चौल-आग्राव रस्ता नुतनीकरण संथ गतीने होत असून संबधीत खात्याने लक्ष्य देवून सदर ठेकेदारास कामाच्या पुर्ततेचा कालावधी जाहीर करावा अन्यथा सदर ठेकेदारास काळया यादीत टाकून हे काम काढून घेण्यात यावे अशी मागणी पंचक्रोशीतून सर्व थरातून केली जात आहे.


