ताज्याघडामोडी

चौल येथे मोफत आरोग्य व नेत्रतपासणी शिबीरास मोठा प्रतिसाद दिलिपशेठ भोईर चॅरिटेबल ट्रस्ट व मिनिडोर संघटनेचा स्तुत्य उपक्रम

चौल येथे मोफत आरोग्य व नेत्रतपासणी शिबीरास मोठा प्रतिसाद
दिलिपशेठ भोईर चॅरिटेबल ट्रस्ट व मिनिडोर संघटनेचा स्तुत्य उपक्रम
रेवदंडा (महेंद्र खैरे) – चौल येथील श्री मल्लेश्वर मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य, नेत्रतपासणी व चष्मे वाटप शिबीरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. झिराड येथील दिलिपशेठ विठ्ठल भोईर चॅरिटेबल ट्रस्ट व संकल्पसिद्धी चालक-मालक मिनिडोर संघटनेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला होता. नवी मुंबई-खारघर येथील मेडिकव्हर हॉस्पिटलचे विशेष सहकार्य या शिबिराला लाभले.

मंगळवार, दि. २८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत शिबीर पार पडले. या उपक्रमासाठी संघटनेचे अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य दिलिपशेठ भोईर (छोटमशेठ) यांचे मार्गदर्शन लाभले. उपाध्यक्ष संतोष म्हात्रे, कार्याध्यक्ष जितेंद्र म्हात्रे, सचिव किशोर नाईक, उपसचिव वैभव म्हात्रे, खजिनदार सुरेश पाटील, उपखजिनदार दीपक नागवेकर यांच्यासह इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
मेडिकव्हर हॉस्पिटलच्या टीमकडून कॅम्प मॅनेजर प्रतीक ठाकूर, डॉ. साक्षी ठाकूर व इतर सहकाऱ्यांनी सेवा दिली. शिबिरामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह तपासणी, मोफत ईसीजी, वजन, उंची, बीएमआय आदी तपासण्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आल्या.
या शिबिराचा लाभ २०० हून अधिक नागरिकांनी घेतला असून, ५० हून अधिक लाभार्थ्यांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच १८ रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पुढील उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य सचिन राऊळ यांनी शिबिरास सदिच्छा भेट देत उपक्रमाचे कौतुक केले. राज धुमाळ यांनी शिबिराचे नियोजन यशस्वीरीत्या पार पाडले.
सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *