नागाव येथे श्री साई नेत्रालयात मोफत नेत्र उपचार शिबिर संपन्न
नागाव येथे श्री साई नेत्रालयात मोफत नेत्र उपचार शिबिर संपन्न
रेवदंडा, ता. अलिबाग (महेंद्र खैरे) – श्री साई आरोग्य सेवा चॅरिटेबल ट्रस्ट, नागाव यांच्या वतीने संचालित श्री साई नेत्रालयामध्ये दर महिन्याच्या २३ तारखेला आयोजित करण्यात येणारे मोफत नेत्र तपासणी व उपचार शिबिर उत्साहात पार पडले. या शिबिरात परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घेतला.
सकाळी ९.० ते दुपारी १.० या वेळेत पार पडलेल्या शिबिरामध्ये रुग्णांची मोफत डोळ्यांची तपासणी करण्यात आली तसेच आवश्यक त्या रुग्णांसाठी मोफत ऑपरेशनची सोय उपलब्ध करून देण्यात आली. दर महिन्याप्रमाणे याही वेळी सुमारे ६० रुग्णांची तपासणी करण्यात आली.
या शिबिरासाठी वैद्यकीय पथकात डॉ. हेत किरण मार्माणिया यांनी मार्गदर्शन केले. ऑप्टोमेट्रिस्ट म्हणून कन्से प्रातकी मगत यांनी सेवा दिली, तर लॅब स्टाफमध्ये दिपेश पाटिल व किरण नेमन यांनी कार्य केले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सुरेश खडपे, डेसमंड हाळे, सुबोध पोसामे, विकास हाळे, अनिल चौलकर, शरद वरसोटकर, प्रकाश पाटिल, शिवराम पटेल आणि सुरेश मेहेरे यांनी मोलाचे सहकार्य केले.
गरजू नागरिकांनी या मोफत नेत्र उपचार शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


