दोन महिन्यात उमटे धरण गाळ काढण्यात यावा- जि.प. सदस्य डाँ. सचिन राउळ जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रणाच्या दिशा आढावा सभेत मागणी
दोन महिन्यात उमटे धरण गाळ काढण्यात यावा- जि.प. सदस्य डाँ. सचिन राउळ
जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रणाच्या दिशा आढावा सभेत मागणी
रेवदंडा-महेंद्र खैरे- अलिबाग तालुक्यातील उमटे धरण गाळाने भरले असून कित्येक वर्ष गाळ न काढल्याने पाण्ाी लवकर संपते, परिणाम पाण्याची तिव्र समस्या उमटे धरणावर अवलंबून असलेल्या गाव व वाडयावर निर्माण होते, तरीही उमटे धरणातील गाळ काढण्यात यावे व तसेच निधी उपलब्ध करावा अशी मागणी चौल गट जिल्हा परिषद सदस्य म्हणून डाँ. सचिन राउळ यांनी अलिबाग येथील जिल्हा नियोजनाच्या जिल्हा विकास समन्वय व संनियत्रंण दिशा आढावा सभेत उपस्थितां समोर मागणी केली.
जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण दिशा समितीची आढावा सभा खासदार श्रीरंग बारणे यांचे अध्यक्षतेखाली तसेच खासदार सुनिल तटकरे यांच्या सहअध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजीत करण्यात आली. या सभेत आमदार महेंद्र दळवी, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, उपाध्यक्ष मधुकर पाटील, कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकूंठ पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती रसिका केणी, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलिस अधिक्षक आंचल दलाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रूपाली सातपुते, उपजिल्हाधिकारी रविंद्र शेळके, तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख अधिकारी उपस्थ्ाित होते.
अलिबाग तालुक्यातील उमटे धरण गाळाने भरले असून कित्येक वर्ष गाळ न काढल्याने पाण्ाी लवकर संपते, परिणाम पाण्याची तिव्र समस्या उमटे धरणावर अवलंबून असलेल्या गाव व वाडयावर निर्माण होते, तरीही उमटे धरणातील गाळ काढण्यात यावे व तसेच निधी उपलब्ध करावा अशी मागणी चौल गट जिल्हा परिषद सदस्य म्हणून डाँ. सचिन राउळ यांनी केली. यावेळी खासदार श्रीरंग बारणे गाळ काढून घेण्यात यावा असे म्हटले, यावेळी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून एव्हढा निधी गाळ काढण्यासाठी शक्य नाही असे सांगितले. यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी गाळ काढणे गरजेचे असून त्यासाठी सिएसआर फंड निधीची तरतूद केली पाहिजे असे विचार मांडले. दरम्यान जि.प.सदस्य डाँ. सचिन राउळ यांनी पावसाळा येत आहे,त्यापुर्वीच गाळ काढावा, त्यासाठी तरतुद करण्यात यावी अशी मागणी केली.
चौल जिल्हा परिषद गटातून डाँ. सचिन राउळ हे पहिल्यांदा निवडून गेले आहेत. जिल्हा नियोजनाचा सभेत उमटे परिसरातील वाडावस्ती, गावे तसेच चौल जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या रेवदंडा, चौल, वरंडे व नागाव तसेच आक्षी ग्रामपंचायतीत उमटे धरणातील पाणी पुरवठा तसेच जानेवारी व मे महिन्यात निर्माण होत असलेली पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्येचा मुद्दा उपस्थित करून येथील लोकांच्या मनातील प्रश्नाला वाचा फोडली. नवनिर्वाचीत जि.प.सदस्य डाँ. सचिन राउळ यांनी उमटे धरण पाणी पुरवठा, तसेच गाळ व स्थानिकांच्या पाणी प्रश्न जिल्हा नियोजन समिती पुढे मांडल्याबद्दल स्थानिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले.


