रेवदंडा चंपावती पतसंस्थेचे 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

रेवदंडा-महेंद्र खैरे-चंपावती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, रेवदंडा या संस्थेची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली.
चौल सागमळा येथील पाठारे क्षत्रीय समाज हॉल येथे रविवार दि.19 जुलै 2026 रोजी दुपारी ठिक 3.30 वाजता चंपावती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत, रेवदंडा या सस्थेची 30 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष विश्वास विनायक जोशी यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी चंपावती पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रसाद शशिकांत आठवले,सचिव उल्हास काशिराम तुरकर,संचालक अरविंद दत्तात्रेय मनोहर,संचालक दिलिप जसभाई पटेल,संचालक विलास लक्ष्मण धाटावकर, संचालिका शामल गजानन पराड, संचालक अभय दत्तात्रय मोडक,संचालक संजय अनंत ठाकुर,संचालिका श्रीमती बिना भावेश पटेल,संचालिका स्नेहा संकेत जोशी,तज्ञ संचालक पांडुरंग विष्णू मोहिते, तज्ञ संचालक डाँ. केदार ओक, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय दशरथ मानकर आदीची उपस्थिती व्यासपिठावर होती. यावेळी मोठया संख्येने चंपावती पतसंस्थेचे सभासद उपस्थित होते.
[caption id="attachment_2607" align="aligncenter" width="2560"]
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; hdrForward: 0; highlight: false; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 44;[/captionप्रारंभी सभासदांसाठी सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्राध्यापक एस.बी. वाटाणे यांचे प्रशिक्षण, मार्गदर्शन उपस्थित सभासदांना करण्यात आले. त्यानंतर दिवंगताना श्रध्दाजंली व उपस्थित पतसंस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक तसेच उपस्थित सभासद वर्ग यांचे शाब्दीक स्वागत तसेच प्रास्ताविक पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मानकर यांनी केले. त्यानंतर समाजात उल्लेखनिय व गुणवंताचा सत्कार कार्यक्रम घेण्यात आला, यामध्ये डॉक्टर पदवी प्राप्त भक्ती गणेश झावरे, बि.एस.सी.आयटी पदवी प्राप्त देवेंद्र रोहिदास घरत, दहावी परिक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण गार्गी रविंद्र राऊळ, तसेच रस्त्यात सापडलेले गहाळ सोन्याचे मंगळसुत्र प्रामाणिकपणे परत करणारा थेरोंडा येथील सुषमा मंगेश सरपाटील व विदया रूपेश नवरीकर तसेच नवनिर्वाचीत पाचकळशी पाठारे क्षत्रिय समाजाचे अध्यक्ष अनंत घरत यांचा सत्कार शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ तसेच प्रमाणपत्र प्रदान करून पतसंस्थेचे अध्यक्ष,संचालक यांचे हस्ते करण्यात आले[caption id="attachment_2608" align="aligncenter" width="2560"]
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; hdrForward: 0; highlight: false; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 47;
यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष विश्वास जोशी, संचालक दिलिप पटेल यांनी उपस्थित सभासदांशी संवाद साधून मार्गदर्शन केले


