ताज्याघडामोडी

चौल सोंडेपार येथे कोल्हाई देवी मंदिर जिर्णोध्दार सोहळा उत्साहात

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; hdrForward: 0; highlight: false; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 47;
चौल सोंडेपार येथे कोल्हाई देवी मंदिर जिर्णोध्दार सोहळा उत्साहात
रेवदंडा-महेंद्र खैरे- चौल सोंडेपार येथे कोल्हाई देवी मंदिर जिर्णोध्दार सोहळा नुकताच संपन्न झाला. चौल सोंडेपार ग्रामस्थांचे मागणीने आमदार महेंद्र दळवी यांचे निधीतून व नवनिर्वाचीत जि.प.सदस्य डाँ.सचिन राउळ यांचे प्रयत्नाने कोल्हाई देवी-उताणी देवी मंदिराचे जिर्णोध्दार करण्यात आला आहे.
बुधवार दि. 29 एप्रिल रोजी सायकांळी सहा वाजता कोल्हाई देवी-उताणी देवी मंदिराचे जिर्णोध्दार सोहळा कार्यक्रमाचे नियोजन सोंडेपार ग्रामस्थांचे वतीने करण्यात आले होते. या निमित्त जिल्हा परिषद सदस्य दिलिप भोईर उर्फ छोटम शेठ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर जिल्हा परिषद सदस्य डाँ. सचिन राउळ, चौल पंचायत समिती गण सदस्या अंकिता घरत, रेवदंडा पंचायत समिती गण सदस्य शरद गोंधळी यांचेसह प्रविण राउत,चौल शिवसेना पंचायत समिती विभाग प्रमुख प्रशांत शेवणईकर, सिध्देश शेवणईकर, महेंद्र घरत, सुदेश राउळ, अलिबाग मुरूड विधानसभा मतदार संघ संघटिका तनुजा मोरे-घरत, रेवदंडा महिला आघाडी प्रमुख शलाका राउत, चौल महिला आघाडी ज्योती मुंबईकर, वृंदा ठाकूर, विशाल ठाकूर, आदी मान्यवर मंडळीसह सोंडेपार ग्रामस्थ व महिला यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
प्रारंभी पंचायत समिती सदस्या अंकिता घरत यांचे हस्ते पुजाअर्चा करण्यात आली त्यानंतर मंदिर जिर्णोध्दार नामफलकाचे अनावरण जिल्हा परिषद सदस्य डां. सचिन राउळ यांचे शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर सोंडेपार ग्रामस्थांचे वतीने मान्यवर उपस्थित जि.प.सदस्य डॉ.सचिन राउळ, पंचायत समिती सदस्या अंकिता घरत, पंचायत समिती सदस्य शरद गोंधळी,प्रविण राउत, महेंद्र घरत, तनुजा मोरे-घरत,शलाका राउत, ज्योती मुंबईकर आदीचे शाल,श्रीफळ व पुष्पगूच्छ प्रदान करून स्वागत करण्यात आले.
त्यानंतर प्रमुख पाहूणे जिल्हा परिषद सदस्य दिलिप भोईर उर्फ छोटम शेठ यांचे आगमन झाले, त्यांनी मंदिरात कोल्हाई देवीची पुजाअर्चा करून दर्शन घेतले. यावेळी त्यांचे स्वागत चौल सोंडेपार ग्रामस्थांचे वतीने शाल,श्रीफळ व पुष्पगूच्छ प्रदान करून करण्यात आले.
चौल जिल्हा परिषद सदस्य म्हणून लोकोपयोगी तसेच विविध विकासकामे निश्चितपणे पुर्ण करण्याचा प्रयन्त राहील, लोकांनी दिलेला विश्वासाल तडा जाणार नाही असे डाँ.सचिन राउळ यांनी असे सांगून यावेळी चौल मध्ये अनेक कामे मार्गी लागली असून उर्वरीत कामे लवकरच पुर्ण केली जातील असेही म्हटले.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ग्रामस्थ-अध्यक्ष निलेश ठाकूर, ग्रामस्थ विशाल ठाकूर, वृंदा ठाकूर, विपुल ठाकूर, दिनेश म्हात्रे, संदेश मळेकर, शुभम मळेकर आदीने विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *