रेवदंडा येथे महाराजस्व समाधान शिबीर संपन्न शासकीय योजना गावागावात पोहचविण्याचे प्रयत्न – उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण

शासकीय योजना गावागावात पोहचविण्याचे प्रयत्न – उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण
रेवदंडा-महेंद्र खैरे- रेवदंडा येथे 1 मे महाराष्ट्र दिनाचे औचित्याने महाराजस्व समाधान शिबीर महसुल मंडळ चौल यांचे वतीने संपन्न झाले, शासकीय योजना गावागावात पोहचविण्याचा प्रयत्न या शिबीरातून केला जात असल्याचे प्रतिपादन अलिबाग उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी केले.
रेवदंडा भंडारी समाज सभागृहात शासनाचे वतीने महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते, या प्रसंगी अलिबाग उपविभागीचय अधिकारी मुकेश चव्हाण हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तसेच निवासी नायब तहसिलदार संदिप जाधव यांचेसचौल जि.प.सदस्य डाँ.सचिन राउळ,पंचायत समिती सदस्य शरद गोंधळी, सरपंच प्रफुल्ल मोरे, हेमंत जनार्दन गणपत, या मान्यवरासह मंडळ अधिकारी किहीम – मेतरी, मंडळ अधिकारी अलिबाग-रेवसकर, सहाय्यक महसुल अधिकारी नयन नाईक, नागाव मंडळ अधिकारी-नाईक, मल्याण महसुल अधिकारी -शुभम चेरू आदीची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अजित हरवंडे यांनी केले.
कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन व राजिप शाळा विदयार्थीनेचे स्वागतगीत, महाराष्ट्र गीत गायन यांनी करण्यात आले. त्यानंतर व्यासपिठावर उपस्थित मान्यवर चौल जि.प.सदस्य डाँ.सचिन राउळ,पंचायत समिती सदस्य शरद गोंधळी, सरपंच प्रफुल्ल मोरे, हेमंत जनार्दन गणपत यांचे स्वागत शाल,श्रीफळ व पुष्पगूच्छ चौल महसुल मंडळाचे वतीने प्रदान करण्यात आले. तसेच उपस्थित शासकीय अधिकारी यांचे स्वागत चौल महसुल मंडळाचे वतीने पुष्पगूच्छ प्रदान करून करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास उपस्थित प्रांत अधिकारी मुकेश चव्हाण यांचे स्वागत सरपंच प्रफुल्ल मोरे व नायब तहसिलदार यांचे स्वागत जि.प.सदस्य डाँ. सचिन राउळ यांचे हस्ते करण्यात आले.
या शिबीरात प्रलंबीत फेरफार, सातबारा मधील चुकांची दुरूस्ती, डिजीटल स्वाक्षरीचे सातबारा व 8-अ उताराचे वाटप, उत्पन्न,रहिवाशी,जातीचा प्रमाणपत्र, नॉनक्रिमिलेअर प्रमाणपत्र,अकृषीक-एनअे तरतुदी बाबत मार्गदर्शन व सुधारणा, नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती, सामाजीक अर्थसहाय्य योजनाचे लाभ मंजूर करणे, विदयार्थ्यासाठी दाखले वाटप, वर्ग 2 जमिनीचे वर्ग 1 मध्ये रूपातंर, तुकडेबंदी कायदयाचे उल्लघंन प्रकरणाचे निटपना, घरासाठी पट्टे वाटप व ई मोजणी अर्ज, ॲग्रीस्टॅक व पि.एन.किसान नोंदणी, भुसंपादन व अकृषीक परवानगी प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अदयावत करणे, आदी प्रकरणी दाखले वाटप उपस्थित लाभार्थीना मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमांचे शेवटी उपविभागीय अधिकारी यांनी शासनाचे वतीने उपस्थितांना मार्गदर्शन करताना आयोजीत महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजनाची माहिती सांगितली.
फोटो ओळ-चौल मंडळ अधिकारी याचे वतीने आयोजीत महाराजस्व समाधान शिबीरात लाभार्थीना दाखला वाटप करताना जि.प.सदस्य डाँ.सचिन राउळ यावेळी उपस्थित उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, नायब तहसिलदार संदिप जाधव, पं.स.सदस्य शरद गोंधळी, सरपंच प्रफुल्ल मोरे व अन्य शासकीय अधिकारी


