अलिबाग येथे रंगली हातावरील भंडारी खेळी नारळ फोडी स्पर्धा; मालवण येथील विशाल मुणगेकर ठरला महाविजेता
अलिबाग येथे रंगली हातावरील भंडारी खेळी नारळ फोडी स्पर्धा; मालवण येथील विशाल मुणगेकर ठरला महाविजेता
रेवदंडा | प्रतिनिधी
भंडारी भवन अलिबाग येथे कित्ते भंडारी हितवर्धक मंडळ, अलिबाग-रायगड यांच्या वतीने आयोजित ‘हातावरील खेळी नारळ फोडी स्पर्धा’ (पर्व १) अत्यंत चुरशीच्या, उत्साही आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. कोकणातील पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देणे आणि स्थानिक खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळवून देणे या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत संपूर्ण जिल्ह्यातून खेळाडूंनी मोठा प्रतिसाद नोंदवला.
स्पर्धेचा निकाल व विजेते खेळाडू
प्रथम पारितोषिक (भव्य चषक + डबल डोअर फ्रीज) विशाल मुणगेकर (मालवण, सिंधुदुर्ग), द्वितीय पारितोषिक (भव्य चषक + वॉशिंग मशीन):किरण राऊत (वरसोली – अलिबाग)
तृतीय पारितोषिक (भव्य चषक + स्मार्ट टी.व्ही.): दीप केरकर (मालवण), चतुर्थ पारितोषिक (भव्य चषक + सायकल): गजानन दामोदर मोरे (अलिबाग), उत्तेजनार्थ व विशेष उप-पारितोषिके उत्कृष्ट नारळ (मायक्रो ओव्हन)किरण राऊत (वरसोली – अलिबाग), एका नारळाने जास्तीत जास्त १३ नारळ फोडून हा विक्रम केला.
उत्कृष्ट फटकेबाज (होम थिएटर): **मनोज मयेकर (नागाव – अलिबाग), उत्कृष्ट शिस्तबद्ध संघ (कुलर):संतोष हळदणकर (मालवण)
यावेळी ज्येष्ठ उद्योजक व समाजसेवक राजनभाई नार्वेकर, विश्वस्त नरहरी धनाजी तथा तोडणकर गुरुजी , अध्यक्ष कमलाकर पडवळ, उपाध्यक्ष मधुकर पारकर, यशवंत राऊत, सनदी लेखापाल संजय राऊत, प्रसन्न खडपे, सरपंच प्राजक्ता खडपे, सरपंच प्रफुल्ल मोरे, माजी सरपंच सुरेश खोत, प्रशांत चिंबुलकर, तुकाराम शिलधनकर, सदस्य संतोष मोरे, राजन वाडकर, ग्रामपंचायत सदस्य साहिल रमेश पाटील, व दक्षिण रायगड उप जिल्हा प्रमुख – शिवसेना शैलेश पांडुरंग चव्हाण, मनोहर कासेकर, दिलीप मुकादम, मुरूड अध्यक्ष दीपक मयेकर, दीपक आंबुकर, ग्रामपंचायत किहीम सदस्य संतोष कीर, जनार्दन राऊत , सुरेश खडपे, अमोल मयेकर, राजेंद्र बांदिवडेकर , भारत रांजणकर , प्रथमेश नार्वेकर, प्रफुल्ल नागवेकर, शैलेश राऊत, सचिन खेऊर, आदी उपस्थित होते.
यावेळी रुद्रा पिळणकर हिने दांडपट्टा व लाठी काठीच्या प्रात्यक्षित दाखवून सर्वांचे मन जिंकले.
सूत्रसंचलन शुभांगी कवळे, जगदीश राऊत यांनी केले.
