ताज्याघडामोडी

चौलमध्ये ब्राह्मण समाजातर्फे १४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान ‘ज्ञानयज्ञ’चे आयोजन

चौलमध्ये ब्राह्मण समाजातर्फे १४ ते १६ ऑक्टोबरदरम्यान ‘ज्ञानयज्ञ’चे आयोजन
रेवदंडा : प्रतिनिधी — चौल येथील ब्राह्मण समाज, चौल यांच्या वतीने सलग तीन दिवस विविध विषयांवरील व्याख्याने आणि पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘ज्ञानयज्ञ’ या उपक्रमाचे यंदा २६ वे वर्ष असून, बुधवार दि. १४ ऑक्टोबर ते शुक्रवार दि. १६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत श्री सुंदर नारायण मंदिर, चौल नाका येथे कार्यक्रम होणार आहेत.
बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाची सुरुवात श्री. नवीन म्हात्रे लिखित ‘प्राचीन चौल व्यापारी बंदराचा इतिहास’ या पुस्तकाच्या प्रकाशनाने होणार आहे. यानंतर डॉ. सचिन जोशी यांचे ‘चौल पुरातत्त्वीय उत्खनन : कारणे, महत्त्व आणि परिणाम’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या दिवसाचा कार्यक्रम सायंकाळी ४ ते ६.३० या वेळेत होईल.
गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी सौ. आभा कर्दीकर यांचे ‘आकाशातील ग्रह… पृथ्वीवर उलथापालथ!’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत होणार आहे.
शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर रोजी श्री. अनिल वामन देशमुख (निवृत्त पोलीस अधिकारी) यांचे ‘सागरी सीमा सुरक्षा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाची वेळ सायंकाळी ५ ते ६.३० अशी आहे.
चौलच्या ऐतिहासिक, पुरातत्त्वीय, वैज्ञानिक आणि सुरक्षाविषयक बाबींवर नागरिकांना माहिती मिळावी, या उद्देशाने विविध विषयांची निवड करण्यात आली आहे. श्री सुंदर नारायण मंदिर, चौल नाका येथे होणाऱ्या या ज्ञानयज्ञ कार्यक्रमास सर्वांसाठी प्रवेश खुला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक ब्राह्मण समाज, चौल यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *