ताज्याघडामोडी

मुरूड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा उद्धाटन सोहळा उत्साहात

आजचे विदयार्थी उदयाचे वैज्ञानिक असू शकतील – जि.प.सदस्या मानसीताई दळवी
मुरूड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा उद्धाटन सोहळा उत्साहात
रेवदंडा-महेंद्र खैरे- माजी राष्ट्रपती व वैज्ञानिक अब्दुल कलाम यांच्या कार्याचा उल्लेख करून आजचे विदयार्थी उदयाचे वैज्ञानिक असू शकतील असे उद्गार मुरूड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्धाटन प्रसंगी प्रमुख अतिथी जि.प.सदस्या मानसीताई दळवी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना काढले. यावेळी विज्ञान प्रदर्शनात विदयार्थ्यानी सौर दिवे, कचरा विघटन आदी वैज्ञानिक दृष्टीकोनातून कल्पकतेने साकारलेल्या कलागुणाचे कौतुक केले.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: null;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 51;
चोरढे येथे माध्यमिक व प्राथमिक शाळांच्या सहभागाने मुरूड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन दि.19 व 20 नोव्हेबर 2026 रोजी मुरूड पंचायत समिती शिक्षण विभागाचे वतीने आयोजीत करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचा उद्धाटन सोहळा गुरूवार दि.19 नोव्हेबर रोजी सकाळी अकरा वाजता संपन्न झाला. प्रसंगी विज्ञान प्रदर्शनाचे मुख्य उद्धाटक म्हणून जि.प.सदस्या मानसीताई दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीसह मुरूड पंचायत समिती सभापती निलेश घाटवळ, जि.प.सदस्या ज्योती नागावकर, उपसभापती अश्विनीताई जंगम, पंचायत समिती सदस्य गणेश नाक्ती, पंचायत समिती सदस्या अश्विनी डोंगरीकर, मुरूड पंचायत समिती गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ, गटशिक्षणाधिकारी कुमार जपकर, पोषण आहार अधिक्षक सुनिल गवळी, वळके शाळा केंद्र प्रमुख राजेंद्र नाईक, मुरूड पंचायत समिती साधन व्यक्ती प्रविण भगत, चोरढे महात्मा गांधी विदयालय मुख्याधिपिका माधुरी भिडे, चोरढे मराठी शाळा मुख्याधिपिका संगिता भगत,चोरढे ग्रा.प.सरपंच तृप्ती घाग, चोरढे ग्रा.प.उपसरपं चंद्रकांत वाघे, तळेखार सरपंच विजय घाणेकर, शिवसेना रोहा तालुका प्रमुख उद्देश वाडकर, मुरूड पंचायत समिती शिक्षण सल्लागार भगिरथ पाटील देवानंद गोगर, जगदीश चवरकर,चोरढे विदयालय अध्यक्ष काशिनाथ तांबडे, विज्ञान गणित अध्यापक मंडळ अध्यख सुरेश मोरे, तसेच सर्व केंद्र प्रमुख मुख्याध्यापक,शिक्षकवृंद, आदी उपस्थित होते. तसेच सर्व संघटना अध्यक्ष व पदाधिकारी साधन व्यक्ती व विशेष शिक्षक, मुरूड पंचायत समिती कार्यालयीन कर्मचारी आदीसह विदयार्थी व पालकवर्ग मोठया संख्येने उपस्थ्ाित होते.
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; hdrForward: 0; highlight: false; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 48;
प्रारंभी कार्यक्रमाच्या उद्धाटन जि.प.सदस्या मानसीताई दळवी, सभापती निलेश घाटवळ, जि.प.सदस्या ज्योती नागावकर, उपसभापती अश्विनी जंगम, आदी मान्यवराचे फटाक्याचे आतषबबाजीने, विदयार्थ्यी लेझीम पथक तसेच औक्षण करून भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर आयोजीत विज्ञान प्रदर्शनाचे जि.प.सदस्या मानसीताई दळवी यांचे हस्ते दिपप्रज्वलन तसेच सभापती निलेश घाटवळ यांचे हस्ते श्रीफळ वाढवून तसेच विज्ञान प्रदर्शन दालनाचे मानसीताई दळवी व निलेश घाटवळ यांचे हस्ते फित कापून फित कापून भव्य उद्धाटन केले. या निमित्त उपस्थित प्रमुख अतिथी मानसीताई दळवी आदीने विदयार्थ्याच्या सादरीकरण केलेल्या विज्ञान प्रायोजीत प्रकल्पाची पहाणी करून माहिती घेतली.
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: null;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 49;
त्यानंतन उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्कार कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते, यावेळी प्रमुख उद्धाटक मानसीताई दळवी, सभापती निलेश घाटवळ,तसेच उपस्थित मान्यवर यांचे हस्ते शाल,श्रीफळ व स्मृती चिन्ह प्रदान करून सत्कार मुरूड पंचायत समितीचे वतीने करण्यात आला. प्रारंभी पंचायत समितीचे सुनिल गवळी यांची प्रास्ताविकात विज्ञान प्रदर्शनाचे माध्यमातून विदयार्थ्याच्या कलागुणांचा प्रोत्साहीत करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले. तर जि.प.सदस्या ज्योती नागावकर यांनी विज्ञान प्रदर्शन व विदयार्थ्याच्या सादरीकरणाचे कौतुक केले. यावेळी विज्ञान प्रदर्शनाच्या उद्धाटक जि.प.सदस्या मानसीताई दळवी यांनी मार्गदर्शन करताना आमदार महेंद्र दळवी यांनी विकास कामासाठी अलिबाग पेक्षा मुरूड तालुक्याला जास्त निधी दिल्याचे सुतोवाच केले तसेच विदयार्थ्यानी विज्ञान प्रदर्शनास सादरीकरण केलेल्या प्रायोगिक विज्ञानाचे कौतुक करून माजी राष्ट्रपती व वैज्ञानिक अब्दुल कलाम यांच्या कार्याचा उल्लेख करून आजचे विदयार्थी उदयाचे वैज्ञानिक असू शकतील असे उद्गार काढले. कार्यक्रमाचे शेवटी महात्मा गांधी विदयालय चोरढे मुख्याधिपिका मधुरा भिडे, जि.प. आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित चवरकर,कार्यक्रमाचे प्रमुख नियोजक राजेंद्र नाईक व सहकारी जगदीश चवरकर, देवानंद गोगर,आदी यांच्या मानसीताई दळवी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजेंद्र नाईक व दर्शना सातमकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *