ताज्याघडामोडी

थेरोंडा पानसेवाडी येथे होळी च्या सना निम्मित क्रीडामहोस्तव साजरा

थेरोंडा पानसेवाडी येथे होळी च्या सना निम्मित क्रीडामहोस्तव साजरा
एक दिवस गाव साठी
रेवदंडा-महेंद्र खैरे- थेरोंडा पानसेवाडी येथे होळी च्या आदल्या दिवशी क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला त्या कार्यक्रमाची सुरुवात रेवदंडा ग्रामपंच्यायत मा सरपंच व पाचकलशी माळी समाज मा अध्यक्ष यांनच्या हस्ते जोगेश्वरी मंदिर सप्तआसरा देवी मंदिर व क्रीडागण येथे नारळ फोडून झाली गावातील सर्व प्रतिष्ठित पंच प्रमुख याना पुष्पगुच्छ देण्यात आले सुरेश घरत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की गेली ७ वर्ष हा उत्सव साजरा करतोय १ दिवस गावा साठी ह्या भूमिकेतून सर्व मुंबई मधे असणारे ग्रामस्थ लग्न होऊन सासरी गेलेल्या मुली ह्या आपल्या कुटुंबा सह आवर्जून कार्यक्रमाचा आनंद लुटण्यासाठी येतात
जेष्ठ नागरिक,महिला,लहान मुलं-मुली ह्या कार्यक्रमात भाग घेतात गावात सर्व एकत्र येऊन विजयी उमेदवाराना टाळ्यांच्या गजरा मधे हसत नाचत बक्षीस देऊन सत्कार करतात हा आगळा वेगळा गावाच्या एकी साठी एक दिवस गावासाठी आपण हा कार्यक्रम करत आहोत
सर्वांचे कौतुक करून सगळ्यांना सहकार्य करायचे आश्वासन केले विनोद घरत यांनी सुद्धा सर्वांना सहकार्य करायचे अश्वासन केले हा कार्यक्रम गावातील तरुण युवक श्री सचिन घरत,निलेश घरत,केतन पाटील,प्रशांत पाटील,प्रशांत घरत,संकेत घरत यांनी गावातील सर्वांना एकत्र आण्यासाठी गावातील पंच प्रमुखाना विश्वासात घेऊन हा कार्यक्रम चालू केला आहे
संगीत खुर्ची,चमचा गोटी,क्रिकेट ह्या कार्यक्रमात लहान मुला पासून जेष्ट नागरिकान पर्यंत सर्व भाग घेतात बक्षीस समारंभ सुरेश घरत यांच्या हस्ते गेली सात वर्ष केला जातो याचे वयक्तिक बक्षीस प्रोस्ताहन पर वेगळे असते त्या कार्यक्रमास सुरेश घरत ,विनोद घरत ,मनोज घरत, भास्कर घरत, अनिल घरत,रामचंद्र पाटील ,मधुकर नाईक ,संतोष घरत ,प्रभाकर घरत, विलास घरत, सुभाष घरत , अशोक पाटील, राकेश परकर, रवींद्र परकर ,सुजित घरत ,विराज घरत, साहिल घरत, संतोष म्हात्रे, सौरव घरत, यश म्हात्रे असे अनेक मान्यवर ग्रामस्त उपस्थित होते २०० ग्रामस्थानी ह्या कार्यक्रमात भाग घेतला सूत्र संचालन निलेश घरत यांनी केले सर्वांना कॉफी नाश्ता देऊन आलेल्या सर्वांचे निलेश घरत यांनी आभार मानले व कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *