शिरगाव शाळेच्या पहिल्या दिवसाची आगळीकता विदयार्थ्यांच्या स्वागतासाठी रथ, सभापतीची उपस्थिती
शिरगाव शाळेच्या पहिल्या दिवसाची आगळीकता
विदयार्थ्यांच्या स्वागतासाठी रथ, सभापतीची उपस्थिती
रेवदंडा-महेंद्र खैरे- मुरूड तालुक्यातील शिरगाव राजिप शाळेच्या पहिला दिवस मोठया आगळीकतेने मुख्याध्यापक राजेंद्र नाईक यांच्या संकल्पनेतून साजरा करण्यात आला, शिवाय मुरूड तालुका पंचायत समिती सभापती निलेश घाटवळ आदी मान्यवरांची उपस्थिती सुध्दा लक्ष्यवेधी होती. या निमित्त विदयार्थ्यासाठी भलामोठा रथातून विदयार्थ्याना शिरगाव गावातून फिरविण्यात आले. यावेळी विदयार्थ्याच्या पालकवर्गानी सुध्दा मोठा प्रतिसाद दिला.
शिरगाव राजिप शाळेत 15 जुन हा विदयार्थ्यासाठी अनोखा ठरला, पहिल्याच दिवशी विदयार्थीवर्गाचे स्वागतासाठी मुरूड तालुका पंचायत समिती सभापती निलेश घाटवळ, शिवसेना उपतालुका प्रमुख भगिरथ पाटील, माजी सभापती चंद्रकांत मोहिते, राजा चवरकर, वळके केंद्र प्रमुख महेश कवळे, शाखा व्यवस्थापन अध्यक्ष नंदु चवरकर, हिराजी ठाकूर, ग्रामस्थ व महिला मंडळ शिरगाव तसेच मोठया संख्येने पालकवर्ग यांची उपस्थिती होती. या स्वागत समारंभाचे संपुर्ण नियोजन शिरगाव राजिप शाळा मुख्याध्यापक राजेंद्र मधुकर नाईक व सहशिक्षीका प्रियंका सुरेश पाटील, यांनी केले.
शिरगाव राजिप शाळेत पहिल्या दिवशी विदयार्थ्याच्या स्वागतासाठी मुख्याध्यापक व सहशिक्षक यांनी जय्यत तयारी केली होती, राजिप शाळेत सुशोभिकरण करण्यात आले होते, तसेच रांगोळी व फुगे यांची आरास पहाण्यासारखी होती, जेणेकरून पहिल्याच दिवशी विदयार्थ्याना शाळेची आवड होईल. शाळेच्या पहिल्या दिवशी पालकवर्गासह विदयार्थी सकाळी दहा वाजता शाळेच्या प्रांगणात पोहचले, त्याचे स्वागत मुख्याध्यापक राजेंद्र नाईक,सहशिक्षकी प्रियंका पाटील यांच्यासह मुरूड तालुका पंचायत समिती सभापती व मान्यवर मंडळी यांनी केले. त्यानंतर धसाडे यांचे मालकीचे रथातून विदयार्थ्यासह सभापती निलेश घाटवल व सोबतीला विदयार्थ्याचे पालकवर्ग यांनी भव्य मिरवणूक शिरगाव गावातून काढण्यात आली. यावेळी ग्रामस्थ व महिलांनी मोठया उत्साहानी या रथातील विदयार्थ्याचे स्वागत केले.
रथ मिरवणूकीतनंतर शाळेच्या सभागृहात प्रमख अतिथी व पालववर्ग यांचे उपस्थितीत विदयार्थ्यासाठी स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, उपस्थ्ाित विदयार्थ्याचे स्वागत सभापती निलेश घाटवळ व उपस्थित मान्यवर मंडळी यांनी पुष्पगूच्छ प्रदान करून केले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र नाईक व सहशिक्षीका प्रियंका पाटील यांच्या वतीने विदयार्थ्याना मान्यवर उपस्थितांचे हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राजेंद्र नाईक यांनी केले.तसेच या कार्यक्रमास मुरूड गटशिक्षण अधिकारी सुनिल गवळी यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रसंगी केंद्र प्रमुख महेश कवळे, शिवसेना उपतालुका प्रमुख भगिरथ पाटील,माजी सभापती चद्रकांत मोहिते यांनी विदयार्थ्याना मार्गदर्शन केले. तर विदयार्थ्याना शाळेची आवड व ओळख निर्माण व्हावी, यासाठी मुख्याध्यापक राजेंद्र नाईक व सहशिक्षीका प्रियंता पाटील यांनी केलेल्या नियोजनाचे कौतूक सभापती निलेश घाटवळ यांनी केले. यावेळी त्यांनी विदयार्थ्यानी खुप अभ्यास करावा, तसेच चांगले करिअर व भविष्य घडवावे असे आवाहन केले.


