ताज्याघडामोडी

मांडळा राजिप शाळा दुरूस्तीस प्रांरभ

मांडळा राजिप शाळा दुरूस्तीस प्रांरभ
जिल्हा परिषद सदस्य ज्योतीताई नागावकर यांचे प्रयत्नातून
रेवदंडा-महेंद्र खैरे- मुरूड तालुक्यातील मांडळा राजिप शाळा दुरूस्तीचा प्रारंभ नुकताच झाला. मांडळा राजिप शाळेचे दुरूस्तीचे काम कोर्लई गट जिल्हा परिषद सदस्या ज्योतीताई नागावकर यांचे प्रयत्नाने उपलब्ध केलेल्या निधीतून करण्यात येत आहे.
मांडळा जिल्हा परिषदेच्या शाळेत विविध दुरूस्ती तसेच नवीन बांधकाम करण्यात येत आहे. या कामाचा प्रांरभ जिल्हा परिषद सदस्य ज्योतीताई नागावकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते चक्रधर ठाकूर,माजी पंचायत समिती सभापती रमेश नागावकर,मांडळा ग्रा.प.सरपंच ॠतीक नागोठकर, मांडळा ग्रा.प.उपसरपंच प्रफुल्ल पालवणकर, मुरूड तालुका शिवसेना अल्पसंख्याक अध्यक्ष अजगर दळवी, मांडळा शिवसेना शाखा प्रमुख संदिप नागोठकर, संतोष घोसाळकर, राजिप शाळा मुख्याध्यापक रमाकांत ठाकूर,मांडळा ग्रा.प.सदस्य राजेश पाटील आदीची उपस्थिती होती.
गेले काही वर्षे जिल्हा परिषदेत प्रशासन असल्याने मांडळा राजिप शाळा दुरूस्तीचे काम रेगांळले होते, लवकरच राजिप शाळा सुरूवात होत असल्याने विदयार्थ्याच्या सुविधेसाठी राजिप सदस्या ज्योतीताई नागावकर यांनी त्वरीत लक्ष्य देवून शाळा दुरूस्तीसाठी निधीची उपलब्धता केली. त्यामुळे मांडळा राजिप शाळा दुरूस्ती तसेच नवीन बांधकामास त्वरेने सुरूवात झाली.
नव्यानेच कोर्लई जिल्हा परिषद गटातून निवडून गेलेल्या ज्योतीताई नागावकर कार्यतत्पर असून सामाजीक कामाची आवड त्यांना आहे. त्याच्या जिल्हा परिषद सदस्य कारर्किदीमध्ये अनेक विविध विकास कामे कोर्लई जिल्हा परिषद गटात निश्चितपणे राबविली जातील असे उपस्थित मुरूड तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष अजगर दळवी यांनी म्हटले. तत्पुर्वी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य ज्योतीताई नागावकर व अन्य उपस्थित मान्यवर यांचे स्वागत पुष्पगूच्छ प्रदान करून मांडळा ग्रामपंचायतीचे सरपंच ॠतिक नागोठकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *