ताज्याघडामोडी

चौल घरत आळी येथील रस्ता कॉक्रिटीकरणाचा शुभारंभ

चौल घरत आळी येथील रस्ता कॉक्रिटीकरणाचा शुभारंभ
रेवदंडा-महेंद्र खैरे-चौल घरत आळी येथील रस्ता कॉक्रिटीकरणाचा शुभारंभ कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या नुतन रस्ता कॉक्रिटीकरणाचे काम चौल घरत आळी ग्रामस्थांचे मागणीने व डाँ. सचिन राउळ यांचे प्रयत्नातून आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डाँ.सचिन राउळ यांची प्रमुख उपस्थितीसह शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते सुदेश राउळ, विभागीय अध्यक्ष प्रशांत शेवणईकर, विशाल ठाकूर, तेजस वर्तक, महेंद्र घरत, चौल शिवसेना शाखा प्रमुख सिध्देश शेवणईकर,निखिल राउत, प्रविण मळेकर, दिलिप मळेकर, दिकपक मळेकर, निम्बिल नाईक, शरद नाईक,चारूदत्त वैदय, विनोद घरत, गिरीष कोतवाल, अरावेंप मढवी, विकास घरत, सुरेश म्हात्रे, सुशिल पिळणकर, सागर म्हात्रे, शितळ म्हात्रे, स्वप्निल मळेकर, संजय नाईक, अनिकेत नाईक, अनिल नाईक, अनिल नाईक, सारिका घरत, संगिता कांबाळे, शितल म्हात्रे, पाडुरंग कांबाळे, प्रभाकर कांबाळे, अनंत कांबाळे, स्मिता म्हात्रे, रेश्मा म्हात्रे, संग्रह घरत, विनया घरत, प्राजक्ता मढवी आदीची उपस्थिती होती.
प्रांरभी उपस्थित घरत आळी महिलांचे वतीने औक्षण करून प्रमुख अतिथी जिल्हा परिषद सदस्य डाँ.सचिन राउळ यांचे स्वागत केले. त्यानंतर उपस्थित महिलावर्गाचे हस्ते पुजाअर्चा करण्यात आली, तसेच जिल्हा परिषद सदस्य डाँ.सचिन राउळ यांचे शुभहस्ते तसेच चौल घरत आळी जेष्ठ ग्रामस्थांचे हस्ते श्रीफळ वाढवून नुतन रस्ता कॉक्रिटीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
चौल मधील अनेक गल्ली रस्ते तसेच आळी रस्त्यांचे कॉक्रिटीकरणाचे काम पुर्ण झाले असून उर्वरीत कामे लवकरच मार्गी लागतील, चौलच्या सर्वागिण विकासासाठी निश्चितपणे जिल्हा परिषद सदस्य म्हणून प्रयत्नशील राहीन असे डाँ. सचिन राउळ यांनी मत व्यक्त केले. यावेळी महेंद्र घरत यांनी उपस्थ्ाित प्रमुख मान्यवरि जिल्हा परिषद सदस्य डाँ. सचिन राउळ तसेच अन्य मान्यवर यांचे स्वागत पुष्पगुच्छ प्रदान करून केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *