ताज्याघडामोडी

चौल तुलाडदेवी टेंभी गल्ली येथ्ाील नुतन कॉक्रिट रस्ताचा शुभारंभ

चौल तुलाडदेवी टेंभी गल्ली येथ्ाील नुतन कॉक्रिट रस्ताचा शुभारंभ
जिल्हा परिषद सदस्य डाँ. सचिन राउळ यांचे शुभहस्ते
रेवदंडा-महेंद्र खैरे- चौल तुलाडदेवी टेंभी गल्ली येथील नुतन कॉक्रिट रस्ताचा शुभारंभ कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. या रस्तासाठी आमदार महेंद्र दळवी यांचे प्रयत्नाने नुतन रस्ता कॉक्रिटीकरणासाठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे.
या प्रसंगी चौल जिल्हा परिषद सदस्य डाँ. सचिन राउळ यांची प्रमुख उपस्थितीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते प्रविण राउत, राष्ट्रवादी काँग्रेस विभागीय अध्यक्ष महेश कवळे, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते नितिन राउत, सुदेश राउळ,विभागीय गण प्रमुख प्रशांत शेणवईकर, मनसे विदयार्थी सेना तालुका अध्यक्ष महेश घरत, सुरेश नागवेकर, शरद राउत, सीमा राउत, शुभम राउत, मनोहर मोगरीकर, सुधाकर म्हात्रे उर्फ भालू, मोहन मोगरीकर, दिलिप राउत, सुभाष राउत, मीना राउत, गणेश घरत, स्वप्नाली घरत, रविंद्र म्हात्रे, कुंदा म्हात्रे, बेजांमिन वासस्कर, रमेश राउत, सुनिल नाईक, अनिल नाईक, विकास घाडगे, अक्षदा अशोक राउत, आशिष काशिनाथ राउत, सिध्देश ठाकूर, महिला शाखा प्रमुख प्राजक्ता नितिन राउत, उपशाखाप्रमुख अमित राउत आदीची उपस्थिती होती.
चौल तुलाडदेवी टेंभी गल्ली रस्ता अनेक वर्षापासून नुतनीकरणासाठी प्रलंबीत होती. या रस्तासाठी स्थानिक ग्रामस्थांचे मागणीनुसार व जि.प.सदस्य सचिन राउळ यांचे प्रयत्नाने आमदार महेंद्र दळवी यांचे माध्यमातून नुतन रस्ता कॉक्रिटीकरणाचे काम करण्यात आले आहे. या नुतन रस्ता कॉक्रिटकरण पुर्ण झाले असून या रस्ताचा शुभारंभ जि.प.सदस्य डाँ. सचिन राउळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रविण राउत व ग्रामस्थ यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
आमदार महेंद्र दळवी यांचे माध्यमातून चौल मधील अनेक रस्ताचे नुतनीकरण पुर्ण झाले असून उर्वरीत रस्ते नुतनीकरण काम पुर्ण लवकरच पुर्ण होतील, चौलच्या विकासासाठी जिल्हा परिषद सदस्य म्हणून निश्चित कटिबंध्द असल्याचे सुतोवाच जि.प.सदस्य डाँ.सचिन राउळ यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *