ताज्याघडामोडी

एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त रेवदंडा बसस्थानकात वृक्षारोपण

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; hdrForward: 0; highlight: false; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 45;
एसटीच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त रेवदंडा बसस्थानकात वृक्षारोपण

रेवदंडा | प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त हरित पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी राज्यभर आयोजित करण्यात आलेल्या वृक्षारोपण अभियानांतर्गत रेवदंडा बसस्थानकात उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले.

रा.प. अलिबाग आगार, रायगड विभाग, पेण यांच्या वतीने आयोजित या उपक्रमाचे नियोजन रेवदंडा बसस्थानक नियंत्रक देवराज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी पत्रकार अभय आपटे यांना विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहण्याचे आमंत्रण देण्यात आले होते.

कार्यक्रमादरम्यान बसस्थानक नियंत्रक देवराज राऊत व पत्रकार अभय आपटे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी एसटी महामंडळातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एसटी महामंडळाने ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यातील बसस्थानके, आगारे व विभागीय कार्यालय परिसरातील सुमारे एक हजार ठिकाणी वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणाचे संरक्षण याबाबत जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील संदेशाप्रमाणे प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *