चोरढे येथील महात्मा गांधी विदया मंदिर नुतन इमारतीचा उद्धाटन सोहळा उत्साहात
जेएसडब्लू फांउडेशनच्या सौजन्याने उभारलेल्या
चोरढे येथील महात्मा गांधी विदया मंदिर नुतन इमारतीचा उद्धाटन सोहळा उत्साहात
विविध क्षेत्रातील विकास कामासाठी सिएसआर निधीचे योगदान असायला हवे-आमदार महेंद्र दळवी
रेवदंडा-महेंद्र खैरे- ग्रामीण भागात समाज मंदिर, विदया मंदिर असा विविध क्षेत्रातील विकास कामासाठी सिएसआर निधीचे योगदान असायला हवे, रायगड जिल्हातील सर्वाधिक उदयोग, इंडस्ट्रिज आहेत परंतू यांच्या सिएसआर निधी कुठे खर्च होतोय हे समजून न येता, सिएसआर निधीचा खर्च फक्त कागदावर दिसतोय असा खोचक टोला आमदार महेंद्र दळवी यांनी जेएसडब्लू फांउडेशनच्या सामाजीक दायित्व विभागाचे सौजन्याने उभारलेल्या चोरढे येथील दिनाभाई मोरे शिक्षण मंडळ सानेगाव संचलित महात्मा गांधी विदया मंदिर नुतन इमारतीचा उद्धाटन सोहळा प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना लगावला.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महात्मा गांधी विदया मंदिरचे स्थानिक शिक्षण समिती अध्यक्ष काशिनाथ तांबडे,उपाध्यक्ष हरिश्चंद्र पाटील,खजिनदार राम भोपी,माजी अध्यक्ष धर्मा भोईर,जेष्ठ सदस्य उमरभाई दाखवे,सदस्य अनिल चोरढेकर,मुख्याधिपिका मधुरा भिडे, सहा.शिक्षक भोरबोले,जे.जी. पाटील,व्ही.जी. आंबलीकर, सहा.शिक्षीका एम.एम.मोरे,लिपिक महेश डोलकर,आर.एल.ठाकूर, एम.व्ही.चोरढेकर,के.एम. शेडगे आदीने विशेष परिश्रम घेतले.

