वाडगाव येथील करिअर मार्गदर्शन शिबीरास उत्फुर्त्स प्रतिसाद
वाडगाव येथील करिअर मार्गदर्शन शिबीरास उत्फुर्त्स प्रतिसाद
रेवदंडा-महेंद्र खैरे-वाडगाव बापदेव सामाजीक सेवाभावी संस्था वाडगांव व ग्रुप ग्रामपंचायत वाडगांव यांचे सयुक्त विदयमाने करिअर मार्गदर्शन शिबीरास विदयार्थी व पालकवर्ग यांच्या उत्फुर्त्स प्रतिसाद लाभला.
वाडगांव क्रिडा संकुल येथील सभागृहात मंगळवार दि. 26 मे 2026 रोजी 10 वी,12 वी व पदवीधर विदयार्थ्यासाठी तसेच पालकवर्गासाठी करिअर मार्गदर्शन
शिबीर सकाळी 10.30 ते दुपारी 1.00 चे दरम्यान आयोजीत केले होते. हे शिबीर वाडगाव बापदेव सामाजीक सेवाभावी संस्था वाडगांव व ग्रुप ग्रामपंचायत वाडगांव यांचे स्तुत्य उपक्रमाने विदयार्थ्याच्या उज्वल भविष्यासाठी, तसेच करिअर निवडताना काय काळजी घ्यावी, तसेच केंद्र व राज्य सरकार मधील नोकरीच्या संधी या विषयावर निवृत्त सहाय्यक आयुक्त केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग सुहास सिताराम पाटील यांचे मार्गदर्शन ठेवण्यात आले होते. या मार्गदर्शन शिबीरास विदयार्थ्यासह पालकवर्गाची उपस्थिती लक्ष्यवेधी होती.
यावेळी प्रमुख वक्ते सुहास पाटील यांचेसह वाडगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष जयेंद्र भगत, उपसरपंच सरिता भगत, बापदेवी सामाजीक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रमेश केशव भगत, उपाध्यक्ष प्रदीप आंग्रे, सचिव प्रभाकर भगत, खजिनदार नंदकुमार थळे, सदस्य भास्कर भगत, सदस्य केशव पाटील, सदस्य दिलिप ठाकूर, सदस्य शंकर पाटील, रूपाली पाटील, सुंगधा पाटील, नथुराम पाटील, निवृत्त नेव्ही अधिकारी विनायक पाटील यांची उपस्थिती होती.
प्रारंभी वाडगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष जयेंद्र भगत यांचे हस्ते करीअर मार्गदर्शक सुहास सिताराम पाटील यांचे सत्कार पुष्पगुच्छ प्रदान करून करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत पुष्पगूच्छ प्रदान करून करण्यात आले.


