ताज्याघडामोडी

चौल येथे रक्तदान शिबीरास उत्फुर्त्स प्रतिसाद

चौल येथे रक्तदान शिबीरास उत्फुर्त्स प्रतिसाद
कै. समीर वैदय मित्रमंडळाचा स्तुत्य उपक्रम
रेवदंडा-महेंद्र खैरे-चौल येथील सुंदर नारायण मंदिरात रक्तदान शिबीरास उत्फुर्त्स प्रतिसाद रक्तदात्याचा लाभला, कै. समिर वैदय मित्रमंडळ, चौल याचे स्त्युत्य उपक्रमान कै.समीर वैदय स्मृतेी निमित्ताने प्रतिवर्षी रक्तदान शिबीर आयोजीत करण्यात येते.
दिवंगत मित्र कै.समिर वैदय यांनी समाजीक बांधिलकी ठेवून अनेक रक्तदान शिबीरे आयोजीत केली तसेच अनेक गरजू रक्तदात्यांना शासकीय रक्तपेढीमार्फत रक्त मिळवून दिले, त्यांचे कार्य नित्याने स्मरणात रहावे, यासाठी चौल कै.समीर वैदय मित्रमंडळ प्रतिवर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन डाँ. केदार ओक यांचे मार्गदर्शनाखाली जयवंत नागवेकर, जितेश नागवेकर,संदेश बेडेकर, प्रशांत जाधव,ॠग्वेद जोशी,सुदर्शन वैदय आदी मित्रमंडळाचे सहकार्याने करण्यात येते. यावर्षी रविवार दि. 24 मे 2026 रोजी चौल येथील सुंदर नारायण मंदिरात रक्तदान शिबीर घेण्यात आले. या रक्तदान शिबीरास रक्तदात्याने उत्तम प्रतिसाद दिले, उन्हाळयांचे दिवस असून सुध्दा 41 जणांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबीरास जिल्हा शासकीय रक्तपेढीचे वतीने रक्त संक्रमण अधिकारी डाँ. दिपक गोसावी, सामाजीक अधिक्षक नवनाथ अली,समुपदेश मनोहर हाडस,रक्तपेढी तंत्रज्ञ हेमकांत सोनार, सुनिल बंदीछोडे, अभिषेक घटन,वैभव कांबळे,रामकुमार निकस, मंगेश भोये,महेश घाडगे, मंगेश पिंगळा आदीने विशेष परिश्रम घेतले.
या रक्तदान शिबीरास जिल्हा परिषद सदस्य डां. सचिन राउळ यांनी सदिच्छा भेट दिली, व रक्तदान शिबीराच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक व्यक्त केले. शिवाय जि.प.सदस्य डाँ. सचिन राउळ यांनी स्वतः रक्तदान केले. या शिबीरास कै. समिर वैदय मित्रमंडळ, चौल याचे वतीने सर्व रक्तदात्याचा विशेष सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *