चौल येथे करिअर मार्गदर्शन शिबीरास उत्फुर्त्स प्रतिसाद

चौल येथे करिअर मार्गदर्शन शिबीरास उत्फुर्त्स प्रतिसाद
रेवदंडा-महेंद्र खैरे-चौल येथील पाठारे क्षत्रीय समाज सभागृहात आयोजीत करिअर मार्गदर्शन शिबीरास विदयार्थी व पालकवर्ग यांच्या उत्फुर्त्स प्रतिसाद लाभला, यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, विदयार्थ्याच्या भविष्यासाठीच करिअर मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात येत असल्याचे प्रतिपाजि.प.सदस्य तथा माजी समाजकल्याण सभापती दिलिपशेठ भोईर उर्फ छोटमशेठ यांनी म्हटले.
चौल व बेलोशी जिल्हा परिषद क्षेत्रातील इयत्ता 10 वी व 12 वी बोर्डाची परिक्षा दिलेल्या विदयार्थ्याच्या उज्वल भविष्यासाठी विशेष्ा उपक्रम म्हणून श्री. दिलिपशेठ विठ्ठल भोईर-उर्फ छोटम शेठ चॅरिटेबल ट्रस्ट झिराड-अलिबाग यांचे माध्यमातून करिअर मार्गदर्शन शिबीर उत्कर्ष फाउंडेशन यांचे सहकार्याने शनिवार दि. 23 मे 2026 रोजी सकाळी दहा ते दुपारी एक चे दरम्यान चौल पाठारे क्षत्रिय समाज सभागृहात आयोजीत करण्यात आले होते.
या करिअर मार्गदर्शन शिबीरास जि.प.सदस्य तसेच माजी समाजकल्याण सभापती दिलिपशेठ भोईर उर्फ छोटम शेठ यांच्या प्रमुख उपस्थितीसह जि.प.सदस्य डां.सचिन राउळ, पंचायत समिती सदस्य शरद गोंधळी, पंचायत समिती सदस्या अंकिता घरत, पंचायत समिती सदस्य संतोष निगडे, खानाव ग्रा.प.माजी सरपंच जितेंद्र गोंधळी, दिपक मोकळसर, रवी नाईक सर, पाठारे क्षत्रीय समाज अध्यक्ष रमेश म्हात्रे, युवा नेतृत्व हर्षल घरत, शिवसेना रेवदंडा शहर अध्यक्ष योगेश पिटनाईक, युवासेना अधिकारी हर्षल घरत, शिवसेना रेवदंडा शहर महिला अध्यक्षा शलाका राउत, अंकुश घरत आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मोठया संख्येने चौल व बेलोशी जिल्हा परिषद गणातील विदयार्थी व पालकवर्ग यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन तसेच राष्ट्रगीताने करण्यात आली, त्यानंतर प्रास्ताविक जि.प.सदस्य तथा माजी समाजकल्याण सभापती दिलिपशेठ भोईर उर्फ छोटमशेठ यांनी केले तर, जि.प.सदस्य डाँ.सचिन राउळ व रमेश म्हात्रे गुरूजी यांनी सुध्दा उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यानंतर उत्कर्ष फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष दिलेद्र शिरधनकर, खजिनदार राहूल पाटील यांनी विदयार्थ्याना करिअर निवड, उच्च शिक्षणाच्या विविध संधी, रोजगाराच्या उपलब्ध मार्ग,आदी विषयावर विदयार्थ्यी व पालकवर्ग यांना योग्य मार्गदर्शन, योग्य शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी करिअर मार्गदर्शन केले. दरम्यान उत्कर्ष फांउडेशनचया माध्यमातून नोकरी प्राप्त विदयार्थी सिधुदुर्ग-प्रतिक सावंत, नागाव-निखिल पडते, सिंधुदुर्ग-निखिल पडते यांचा सत्कारनंतर त्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अँड रोहित भोईर,े संदेश पालकर, राज धुमाळ, नागाव ग्रा.प.सदस्य रोहन नाईक, झिराड ग्रा.प.माजी उपसरपंच महेश माने, राकेश राउत, जयवंत ठाकूर, चेतन पाटील, प्रकाश आत्मकर,आदीने विशेष परिश्रम घेतले.


