सलग आठव्या वर्षी विद्यार्थ्यांना वह्या व कलर पेनचे वाटप श्री किरण ठाकूर यांचा स्तुत्य उपक्रम
सलग आठव्या वर्षी विद्यार्थ्यांना वह्या व कलर पेनचे वाटप
श्री किरण ठाकूर यांचा स्तुत्य उपक्रम
रेवदंडा, दि. ३० जून (महेंद्र खैरे):
रायगड जिल्हा परिषद शाळा, कोर्लई (ता. मुरुड) येथे समाजसेवेचा आदर्श जपत श्री किरण ठाकूर यांनी सलग आठव्या वर्षी इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना वह्या व कलर पेनचे वाटप केले. शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम परिसरात कौतुकास पात्र ठरत आहे.
यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना नियमित शाळेत उपस्थित राहून मनापासून अभ्यास करण्याचा सल्ला दिला तसेच अशा सामाजिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी सकारात्मक भावना निर्माण होत असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला श्री जयेश म्हात्रे, श्री राजेंद्र म्हात्रे, श्री प्रशांत भोय, श्री उपेंद्र बळकवडे, श्री प्रितेश रोटकर, श्री शेखर महालकर यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.
सलग आठ वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम सातत्याने राबविल्याबद्दल श्री किरण ठाकूर यांचे शाळा व्यवस्थापन, शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी मनःपूर्वक आभार मानून त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.
