रेवदंडयातील विठोबा मंदिर नुतन सभागृहाचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम उत्साहात
रेवदंडयातील विठोबा मंदिर नुतन सभागृहाचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम उत्साहात
रेवदंडयात अनेक विकास कामे मार्गी – आमदार महेंद्र दळवी
रेवदंडा-महेंद्र खैरे-रेवदंडयातील विठोबा मंदिर नुतन सभागृहाचा लोकार्पण सोहळा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला, यावेळी अनेक विकास कामे मार्गी लागली असून दुसरांदा आमदार होण्याची संधी जनतेने दिली, त्यामधून अधिका अधिक लोकोपयोगी व विकास मार्गी लावण्याचे मनोगत आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केले.
रेवदंडा येथील विठोबा मंदिर सभागृह लोकार्पण सोहळा कार्यक्रम, श्री सत्यनारायण्ा महापुजेच्या निमित्ताने गुरूवार दि. 21 मे 2026 रोजी सायकांळी सहा वाजता संपन्न झाला. यावेळी आमदार महेंद्र दळवी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, यावेळी जि.प. सदस्य डाँ. सचिन राउळ, अलिबाग पं.स.सदस्य शरद गोंधळी, रेवदंडा ग्रा.प.सरपंच प्रफुल्ल मोरे, ग्रा.प.सदस्या लिना मानकर, किशोर मानकर, ग्रा.प.सदस्य सुराराम माळी, युवा नेते हर्षल घरत, महिला शहर अध्यक्षा शलाका राउत,भारती मोरे, आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
विठोबा आळी नवरात्र उत्सव मंडळ व महिला मंडळ, व ग्रामस्थ यांनी वार्षिक श्री सत्यनारायणाचा पुजा विधी धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या निमित्ताने आमदार महेंद दळवी यांचे प्रयत्नाने नव्याने बांधण्यात आलेल्या सभामंडपाचा लोकार्पण कार्यक्रम सुध्दा घेण्यात आला. प्रारंभी आमदार महेंद्र दळवी यांचे आगमन जोरदार फटक्याचा आतषबाजीने तसेच सुहासिनीने ओवाळणी करून केले, त्यानंतर आमदार महेंद दळवी, जि.प.सदस्य डाँ.सचिन राउळ, पं.स.सदस्य शरद गोंधळी व सरपंच प्रफुल्ल मोरे, शलाका राउत यांचे शुभहस्ते श्रीफळ वाढवून तसेच फित कापून सभागृहाचा लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर आमदार महेंद दळवी यांनी श्री सत्यनारायणाची पुजाअर्चा केली. यावेळी विठोबा आळी नवरात्र मंडळ, ग्रामस्थ व महिला मंडळ यांचे वतीने आमदार महेंद्र दळवी यांना पुष्पगूच्छ प्रदान करून स्वागत सत्कार केला तसेच इतर मान्यवर मंडळीचे सुध्दा पुष्पगूच्छ व शाल,श्रीफळ प्रदान करून सत्कार केले.
आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रयत्नातून विठोबा मंदिर सामाजीक सभागृहासाठी 25 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. यावेळी आमदार महेंद्र दळवी यांचे विठोबा आळी नवरात्र मंडळ, ग्रामस्थ व महिला मंडळ यांनी विशेष आभार व्यक्त केले.


