ताज्याघडामोडी

पोषण पंधरवडयाचा उत्साहात शुभारंभ- सभापती निलेश घाटवळ

मुरूड पंचायत समितीत गरोदर व स्तनदा मातांसाठी अतिरिक्त पोषण आहार वितरण
पोषण पंधरवडयाचा उत्साहात शुभारंभ- सभापती निलेश घाटवळ
रेवदंडा-महेंद्र खैरे- गरोदर माता व स्तनदा मातांच्या आरोग्याला प्राधान्य देत गुरूवार दि. 9 एप्रिल 2026 रोजी अतिरिक्त पौष्टीक आहार वितरणाचा कार्यक्रमाचा उत्साहात शुभारंभ झाल्याचे मुरूड पं.स.मुरूड सभापती निलेश घाटवळ यांनी प्रसिध्दीसाठी म्हटले.
या उपक्रमाचा शुभारंभ पं.स. सभापती निलेश घाटवळ यांचे शुभहस्ते करण्यात आला. यावेळी उपसभापती अश्विनी जंगम,सदस्य तसेच गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांची उपस्थिती होती.मान्यवर उपस्थितांचे हस्ते लाभार्थी महिलांना अतिरिक्त पौष्टीक आहाराचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान आहाराचे महत्व समजावून सांगण्यात आले व योग्य पोषणाचे आरोग्यावर होणारे सत्कारात्मक परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी दि. 9 एप्रिल ते 23 एप्रिल 2026 दरम्यान साजरा होणाऱ्या पोषण पंधरवडाचा शुभारंभ्ा करण्यात आला. तसेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने प्राप्त परिपत्रकाचे वाचन करून उपस्थितांना पोषण पंधरवडयाच्या उपक्रमांची माहिती देण्यात आली.
मुरूड पंचायत समिती सभापती निलेश घाटवळ यांनी पोषण पंधरवडयाच्या उपक्रमास शुभेच्छा देत अशा कार्यक्रमामुळे माता व बालकांना आरोग्याबाबत जनजागृती होवून समाज अधिक सुदृढ होईल, असा विश्वास व्यक्त केला.कार्यक्रमाबाबत त्यांनी समाधान व आनंद व्यक्त केला.
या उपक्रमामुळे गरोदर व स्तनदा मातांमध्ये पोषण विषयक जागरूकता वाढण्यास निश्चितच मदत मिळणार आहे.
फोटो ओळ-मुरूड पं.स. मध्ये गरोदर माता व स्तनदा मातांच्या आरोग्याला प्राधान्य देत गुरूवार दि. 9 एप्रिल 2026 रोजी अतिरिक्त पौष्टीक आहार वितरणाचा कार्यक्रमाचा उत्साहात शुभारंभ झाल्याचे मुरूड पं.स.मुरूड सभापती निलेश घाटवळ यांचे शुभहस्ते करण्यात आला. यावेळी यावेळी उपसभापती अश्विनी जंगम,सदस्य तसेच गटविकास अधिकारी राजेंद्रकुमार खताळ यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *