बेलोशी येथील इसमाची ऑनलाईन व्यवसायाच्या आमिषाने फसवणूक

बेलोशी येथील इसमाची ऑनलाईन व्यवसायाच्या आमिषाने फसवणूक
रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
रेवदंडा (प्रतिनिधी – महेंद्र खैरे) : फेसबुक व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून बेलोशी येथील एका इसमाची तब्बल ₹6.16 लाखांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अलिबाग तालुक्यातील बेलोशी येथील 47 वर्षीय परेश गुंड यांच्याशी अज्ञात महिलेने 29 मार्च ते 7 एप्रिल 2026 दरम्यान फेसबुकवर मैत्री केली. त्यानंतर व्हॉट्सअॅप चॅटिंग व व्हॉईस कॉलद्वारे विश्वास संपादन करून व्यवसायातून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
सदर महिलेने पाठवलेल्या मोबाईल लिंकवरून युपीआयच्या माध्यमातून एकूण ₹6,16,113.40 इतकी रक्कम काढून घेतली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित व्यक्तीने रेवदंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
या प्रकरणी गुन्हा क्रमांक 46/2026 अन्वये माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 (2008 सुधारणा) कलम 66D तसेच भारतीय न्याय संहिता 2023 कलम 318 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे करत आहेत.
👉 नागरिकांनी अशा ऑनलाईन आमिषांपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


