ताज्याघडामोडी

रॉयल्टी न भरलेला 50 टन खडी भरलेला माल वाहतुक ट्रक नवी मुंबईतून दाखल

नागाव पाल्हे पुल बायपास मार्गे रेवदंडा बिल्डकॉन कंस्ट्रशन कंपनीत
रॉयल्टी न भरलेला 50 टन खडी भरलेला माल वाहतुक ट्रक नवी मुंबईतून दाखल
स्थानिक मालट्रक वाहतुक संघटनेचा जोरदार आक्षेप – आंदोलनाचा इशारा
रेवदंडा-महेंद्र खैरे- अलिबाग तालुक्यातील नागाव पाल्हे पुल बायपास मार्गे रेवदंडा बिल्डकॉन कंस्ट्रशन कंपनीत रॉयल्टी न भरलेला 50 टन खडी भरलेला माल वाहतुक ट्रक दाखल झाला, या नवी मुंबईत येथून दाखल झालेल्या खडी माल वाहतुक ट्रक बद्दल स्थानिक श्रीसमर्थ वाहतुक संघटनेनेचे जोरदार आक्षेप घेतला आहे.
सागरी रेवस-रेड्डी महामार्गात रेवदंडा-साळाव पुलाची निर्मिती नव्याने होत आहे, या नवीन पुलाचे व रस्ताचे बांधकाम अशोका बिल्डकॉन या कस्ट्रशन कंपनीकडे आहे. नव्याने होत असलेल्या पुलाचे कामास मालवाहतूकीसाठी व इतर बांधकाम मटेरीयल पुरवठा कामासाठी स्थानिक मालट्रक वाहतुकदारांना प्राधान्य दयावे अशी मागणी येथील श्री समर्थ वाहतुक संघटनेचे वतीने करण्यात आलेली आहे. नव्याने होत असलेल्या पुलाचे कामास वाहतुकीसाठी व इतर बांधकाम मटेरीलयल पुरवठा बाबत स्थानिक मालवाहतुक ट्रकना काम मिळावे, अशी अपेक्षा ठेवून बिल्डकॉन कस्ट्रशन कंपनीकडे पाठपुरावा करण्यात येतो. मात्र तरीही बाहेरील मालवाहतूक ट्रक व्दारे येथे बिल्डकाँन कंस्ट्रशन कंपनी वाहतुक तसेच पुलाचे बांधकामास लागणारी विविध मटेरीयल मागवीत असल्याचा आरोप श्रीसमर्थ वाहतुक संघटनेने केला आहे.
दरम्यान रेवदंडा बायपास येथे बिल्डकाँन कंस्ट्रशन कंपनीत दि. 11 एप्रिल रोजी सकाळी सात वाजता नवी मुंबई येथून 50 टन खडी भरलेला मालवाहतुक ट्रक आला असता, येथील श्रीसमर्थ वाहतुक संघटनेने जोरदार आक्षेप घेतला, या मालवाहतुक खडीचे वाहन चालकाकडून रॉयल्टी भरलेली नसल्याचेही आढळले. शिवाय नागाव पाल्हे पुला मार्गे चक्क 50 टन खडी माल वाहतुक ट्रक आणल्याचे वाहन चालकांने सांगितले. ज्या नागाव पाल्हे पुलावरून अवजड वाहतुक पुर्णपणे बंद असताना, अशोक बिल्डकॉन कस्ट्रशन कंपनी मनमानीने या मार्गे अवजड वाहतुक करत असल्याचे सिध्द होत असल्याचे श्रीसमर्थ वाहतुक संघटनेने जोरदार आक्षेप घेतला.
स्थानिक मालवाहतुक ट्रकना रेवदंडा-साळाव पुलाचे निर्मितीस मालवाहतुकीसाठी तसेच इतर बांधकाम मटेरीयल पुरवठा यासाठी बिल्डकाँन कंस्ट्रशन कंपनी सहकार्य देत नसल्याचे तसेच केलेल्या कामाचे बिले मुद्दामहून अडकवून विलंब करत असल्याचा आरोप श्रीसमर्थ वाहतुक संघटनेने केला आहे. सदर बिल्डकांन कंस्ट्रशन कंपनीच्या विरोधात काम बंद आंदोलन पुकारण्याचा इशारा श्रीसमर्थ वाहतुक संघटनेने दिला आहे. यावेळी रेवदंडा बायपास येथे श्रीसमर्थ वाहतुक संघटनेचे अध्यक्ष मोहन पराड, उपाध्यक्ष संकेत भाटकर, सल्लागार अशोक गुरव आदी पदाधिकारीसह पंचवीस सदस्यांची उपस्थिती होती. सदर प्रकरणात नागाव पाल्हे पुलावरून अवजड वाहतुकीस बंदी असताना, तसेच 50 टन खडी माल रॉयल्टी न भरता, थेट नवी मुंबईतून येथून दाखल होतोय ही बाब विशेष आहेत, रॉयल्टी न भरता 50 टन खडी माल आणला जाताये, तर महसुल खाते खरोखर झोपी गेले आहे का ? असा सवाल सुध्दा केला जात आहे. या वरून बिल्डकॉन कस्ट्रशन कंपनीची मनमानी व थेट वर पासून हात मिळवणी असल्याचे सिध्द होते, असाही आरोप केला जातोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *