फकिरपाडा/नांदाईपाडा येथे भव्य डायरेक्ट व्हॉलिबॉल जिल्हा चाचणी स्पर्धा उत्साहात संपन्न
फकिरपाडा/नांदाईपाडा येथे भव्य डायरेक्ट व्हॉलिबॉल जिल्हा चाचणी स्पर्धा उत्साहात संपन्न
रेवदंडा-महेंद्र खैरे-अलिबाग तालुक्यातील फकिरपाडा/नांदाईपाडा येथ्ज्ञे रायगड जिल्हा डायरेक्ट व्हॉलिबॉल असोसिएशन आणि जय हनुमान क्रिडा मंडळ यांच्या संयुक्त् विदयमाने आयोजीत करण्यात आलेली डायरेक्ट व्हॉलिबॉल जिल्हा चाचणी स्पर्धा 2026-2027 मोठया उत्साहात पार पडली. पुरूष व महिला गटासाठी आयोजीत या स्पर्धेला जिल्हाभरातून खेळाडू व क्रिडाप्रेमीचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या स्पर्धेचा उध्दाटन समारंभ शनिवार दि. 16 मे रोजी सायकांळी 7.00 वाजता पंचायत समिती अलिबाग उपसभापती प्रिया भगत, उदयोजक जितेंद्र म्हात्रे, शिवसेना उपविभाग प्रमुख प्रशांत म्ायेकर, तसेच प्रमुख अतिथी ठाणे येथील नरेश वालेकर,ठाणे येथील अनंत नरे, आवासचे आकांक्षा रणजीत राणे यांचे उपस्थितीत पार पडला. स्पर्धेला आमदार महेंद्र दळवी व जि.प.सदस्य दिलिपशेठ भोईर – छोटमशेठ यांनी शुभेच्छा संदेश दिला. स्पर्धेचा शुभारंभ पंचायत समिती अलिबाग उपसभापती प्रिया भगत यांचे शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत पेण संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अंतिम विजेतेपद पटकावले, बोरपाडा संघ्ा उपविजेता ठरला, त अलिबाग संघाने तृतिय क्रमांक मिळविला. यजमान फकिरपाडा संघाने चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला. या स्पर्धेचा बक्षिस वितरण कार्यक्रम रविवार दि. 17 मे रोजी सकाळी ठिक सहा वाजता झाला. यावेळी डायरेक्ट व्हॉलिबॉल असोसिएशन महाराष्ट्र व डायरेक्ट व्हॉलिबॉल असोसिएशनचे रायगडचे जनरल सेक्रेटरी दिपक मोकल सर, यतिराज पाटील, आशिष पाटील, प्रसन्ना पाटील, गणेश भोईर यांचे हस्ते घेण्यात आला. स्पर्धेतील प्रथम क्रमांकास रूपये 10 हजार व भव्य चषक, व्दितीय क्रमांकास रूपये 7 हजार व भव्य चषक, तृतीय क्रमांकास रूपये 3 हजार व भव्य चषक तसेच चतुर्थ क्रमांकास रूपय 3 हजार व भव्य चषक अशी पारितोषीके मान्यवर उपस्थितांचे हस्ते वितरीत करण्यात आली.
Qu


