filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; hdrForward: 0; highlight: false; module: video;hw-remosaic: false;touch: (0.6865741, 0.7573959);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 45; विद्याथ्यानी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे – निर्वाचीत जि.प. सदस्य विघ्नेश माळी प्रतिपादन
आमदार महेंद्र दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी समुपदेशन: जिल्हा परिषद सदस्य ज्योती नागावकर यांचा समाजोपयोगी कार्यक्रम
रेवदंडा-महेंद्र खैरे- सध्या जगात एआय सारख्या प्रगतशील तंत्रज्ञान क्रियेटिव्ह असून विद्याथ्यानी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करावे असे प्रतिपादन निर्वाचीत जि.प. सदस्य विघ्नेश माळी यांनी म्हाळुंगे बुद्रूक येथील दहावी व बारावी विद्याथ्यासाठी आमदार महेंद्र t यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने आयोजीत समुपदेश व मार्गदर्शन शिबीरात संबोधीत करताना म्हटले.
मुरुड, अलिबाग रोहा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र हरी दळवी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी समुपदेशनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; hdrForward: 0; highlight: false; module: video;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: off;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 47;‘महाळुंगे समाजमंदिरात दहावी आणि बारावी नंतर काय? ‘ या विषयावर सुहास पाटील माजी आयुक्त उत्पादन शुल्क मुंबई यांनी मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. विद्यार्थ्यांनी दहावी बारावीनंतर कोणत्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावा, करिअरची वेगवेगळी क्षेत्रे, विद्यार्थी व पालकांना भेडसावणाऱ्या समस्या, नोकरीच्या संधी, स्पर्धा परीक्षा आणि त्यांची तयारी यासंदर्भात शिक्षक, पालक यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाल्याचे उपस्थितांनी त्यांच्या प्रतिक्रियांद्वारे सांगितले. रायगड जिल्हा परिषद कोर्लई गणाच्या सदस्य ज्योती रमेश नागावकर , मुरुड पंचायत समितीचे माजी सभापती रमेश नागावकर आणि शैलेश रातवडकर प्रमुख आयोजक असलेल्या सदर कार्यक्रमास रायगड जिल्हा परिषद सदस्य विघ्नेश माळी, पंचायत समिती उपसभापती अश्विनी जंगम, पंचायत समिती सदस्य गणेश नाक्ती, सदस्य अश्विनी ठाकूर, गटशिक्षणाधिकारी सुनील गवळी सामाजिक कार्यकर्ते भगिरथ पाटील, भरत बेलोसे, मुकुंद पालवणकर, केंद्रप्रमुख तथा विस्तार अधिकारी महेश कवळे, सुनील पाटील, निलेश वारगे, तालुका शिक्षण समिती सदस्य देवानंद गोगर,शरद पाटील , दर्शना सातामकर यांच्यासह वळके, मांडला, बोर्ली , नांदगाव केंद्रातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, मांडला,महाळुंगे आणि परिसरातील ग्रामस्थ, दहावी बारावीचे शंभराहून अधिक विद्यार्थी त्यांच्या पालकांसह उपस्थित होते. विद्यार्थ्यांसहित सर्व उपस्थितांच्या स्नेहभोजनाची चोख व्यवस्था आयोजकांनी केली . या दिमाखदार सोहळ्याचे सूत्रसंचालन राजेंद्र नाईक आणि जगदीश चवरकर या द्वयींनी केले.