ताज्याघडामोडी

थेरोंडा मार्गातील फुटलेल्या पाईप लाईनची दुरूस्ती नवनिर्वाचीत जि.प.सदस्य डाँ.सचिन राउळ यांच्या प्रयत्नाने

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 40;
थेरोंडा मार्गातील फुटलेल्या पाईप लाईनची दुरूस्ती

नवनिर्वाचीत जि.प.सदस्य डाँ.सचिन राउळ यांच्या प्रयत्नाने

रेवदंडा-महेंद्र खैरे-थेरोंडा आगलेची वाडी कडे मार्गातील रस्तात फुटलेल्या पाईप लाईनची दुरूस्तीचे काम नवनिर्वाचीत जि.प.सदस्य डॉ. सचिन राउळ यांनी तातडीने संबधीतानाचा पाठपुरावा करून सुरू केले.

थेरोंडाफाटा ते आगलेची वाडी येथील डाँ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे बागायती नजीक रस्त्यात गेले कित्येक दिवस पाईपलाईनचे पाणी फुटून पाणी टंचाईच्या तिव्रतेत पाणी वाहून फुकट जात होते, या रस्तात या फुटलेल्या पाईप लाईनच्या पाण्याने रस्तात खड्डे निर्माण होवून पाण्याची गटारे निर्माण झाली होती. या रस्ताने जा-ये करताना पाण्याने भरलेले खड्डे चुकविताना वाहने, मोटरसायकलस्वार तसेच पायी चालत जा-ये करणारे यांना कसरत करावी लागत होती.

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; hdrForward: 0; highlight: false; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 0;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 44;

गेले अनेक दिवस ही फुटलेली पाईप लाईन व वाया जात असलेले पाणी याबाबत कोणीही दखल घेतली नाही, नुकतेच चौल गणातून निवडून गेलेले जिल्हा परिषद सदस्य डाँ.सचिन राउळ यांच्या नजरेने पाण्याची होत असलेली फुकटची नासाडी व तेथे जा-ये करताना होत असलेला त्रास टिपले. त्यांनी त्वरीत याबाबत संबधीत अधिकारी मोहन सरोदे यांची अलिबाग कार्यालयात भेट घेतली, व या थेरोंडा मार्गातील फुटलेली पाईप लाईन व वाया जात असलेले पाणी याबाबत तक्रार केली, व त्वरीत ही फुटलेली पाईप लाईन दुरूस्ती करण्याची मागणी केली.

तद्नुसार संबधीत अधिकारी मोहन सरोदे यांनी जि.प.सदस्य डाँ. सचिन राउळ यांचे मागणीने पाईप लाईन दुरूस्तीचे काम सुरू केले. या फुटलेल्या पाईप लाईनमुळे थेरोंडा गावात होत असलेला नळ पाणी पुरवठयास जोर येत नव्हता, तसेच नळ पाणी पुरवठयाबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी निर्माण झाल्या होत्या. परंतू या फुटलेल्या पाईप लाईने होणारी पाण्याची गळती थांबविण्यासाठी कोणीही प्रयत्नवादी नव्हते, मात्र जिल्हा परिषद सदस्य डाँ. सचिन राउळ यांनी चौल गणातील ही समस्या दुर करण्यासाठी तातडीने लक्ष्य दिले. एकंदरीत लोकप्रतिनिधी कसा असावा, यांचे उदाहरण त्यांनी या कामातून दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *