रेवदंडा अर्बन बँकेची ९७वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

रेवदंडा | प्रतिनिधी
रेवदंडा येथील रेवदंडा अर्बन बँकेची ९७वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी बँकेच्या सभागृहात उत्साहात व शांततेत संपन्न झाली. सभेला बँकेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या अध्यक्षस्थानी बँकेचे विद्यमान अध्यक्ष नजमुसाकिब म. अ. लांबाते होते. प्रारंभी अध्यक्ष लांबाते यांनी प्रास्ताविक करताना बँकेच्या आर्थिक स्थितीचा तसेच वर्षभरातील कामकाजाचा आढावा सभासदांसमोर मांडला.
यावेळी बँकेच्या उपाध्यक्षा धरती निलेश राऊत, संचालक वामन काशिनाथ घरत, प्रभाकर धर्मा नाईक, जाकिरअली हमदुले, सतिश नारायण लेले, आरती अशोक मढवी, गजानन रामदास झेंडेकर, अंजनकुमार बाळकृष्ण तांबडकर, अरूण शंकर म्हात्रे, महेंद्र वसंत पाटील, मंगेश शंकर परभाळे, निलेश नारायण गाडे, तसेच तज्ञ संचालक शादाब मंहमद रफिक काटे यांची प्रमुख उपस्थिती होती. बँकेचे मुख्याधिकारी दिनेश माळी यांच्यासह कर्मचारीवर्गही उपस्थित होता.
सभेत मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कायम करणे, सन २०२५-२६ मधील आर्थिक कामकाज व नफ्याच्या विनियोगास मान्यता देणे, वैधानिक लेखापरीक्षकांच्या अहवालाची नोंद घेणे, सन २०२४-२५ च्या वैधानिक लेखापरीक्षणातील दोष दुरुस्ती अहवालाची नोंद घेणे तसेच सन २०२६-२७ च्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.
तसेच वैधानिक लेखापरीक्षकांच्या पुनर्नियुक्तीबाबतचा प्रस्ताव, सहकार विभागामार्फत जाहीर करण्यात आलेल्या कर्जफेड योजनेअंतर्गत झालेल्या कर्जखात्यांची नोंद, सभेला गैरहजर सभासदांची अनुपस्थिती माफ करण्याबाबतचा विषय तसेच संचालक मंडळाने सभेपुढे ठेवलेल्या विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले.
सभेदरम्यान सभासदांनी विविध विषयांवर सहभाग नोंदवत बँकेच्या कामकाजाबाबत आपली मते मांडली. बँकेच्या प्रगतीसाठी संचालक मंडळ, मुख्याधिकारी दिनेश माळी व प्रशासनाच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती यावेळी देण्यात आली.
सभासदांच्या प्रश्नांना व सूचनांना योग्य प्रतिसाद देत बँकेच्या पुढील वाटचालीबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. मोठ्या संख्येने सभासदांच्या उपस्थितीत झालेल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाज शांततेत व सुरळीतपणे पार पडले.ence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 43;
