नागाव बंदर येथे दोन अंतर्गत रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ
नागाव बंदर येथे दोन अंतर्गत रस्त्यांच्या कामांचा शुभारंभ
रेवदंडा-महेंद्र खैरे-नागाव बंदर परिसरातील नागरिकांच्या दळणवळणाची गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने समीरा प्लाम्सकडे जाणारा अंतर्गत रस्ता तसेच अभिराज पाटील यांच्या गल्लीतील अंतर्गत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. रायगड जिल्हा परिषद सदस्य डॉ. सचिन शरद राऊळ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून ही विकासकामे मार्गी लागली आहेत.
या दोन्ही रस्त्यांच्या कामांमुळे परिसरातील नागरिकांची ये-जा अधिक सुकर होणार असून, दैनंदिन प्रवासातील अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे. परिसरातील नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विकासकामांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या प्रसंगी माजी सरपंच नंदकुमार मयेकर, माजी सरपंच निखिल मयेकर, सरपंच हर्षदा मयेकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर ठाकूर, शरद राऊळ, चंद्रकांत अण्णा पाटील व परिवार, राऊळ परिवार तसेच खारवले परिवार यांच्यासह परिसरातील नागरिकांची प्रमुख उपस्थिती होती.
नागाव परिसरातील मूलभूत सुविधांचा विकास करण्यासाठी यापुढेही सातत्याने प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचे डॉ. सचिन शरद राऊळ यांनी यावेळी सांगितले
