रेवदंडा पंचशील नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
रेवदंडा पंचशील नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
रेवदंडा (प्रतिनिधी – महेंद्र खैरे): रेवदंडा येथील पंचशील नगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या निमित्ताने पंचशील नगर ग्रामस्थांच्या वतीने भव्य सजावट, आकर्षक विद्युत रोषणाई तसेच मंडप उभारण्यात आला होता. व्यासपीठावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भव्य प्रतिमा स्थापित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी रेवदंडा पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर दीपप्रज्वलन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी पंचशील नगर ग्रामस्थांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले.
सायंकाळी पंचशील नगर ते रेवदंडा बाजारपेठ दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ग्रामस्थ, महिला व युवकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नितीन गायकवाड, मधुकर गायकवाड, सचिन पवार, सतीश पवार, ऋतिक पवार, गौरव गायकवाड, अमोल गायकवाड, जीवन जाधव आदींनी विशेष परिश्रम घेतले.


